Home खेलकुद  पुणे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विनर्स कराटे असोसिएशनचा डंका

पुणे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विनर्स कराटे असोसिएशनचा डंका

107

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.9मार्च):-पुणे येथे निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये विनर्स कराटे असोसिएशन सातारा संघाने चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सुपर सनी वर्ल्ड महोत्सव अंतर्गत राज्यस्तरीय निमंत्रित कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेसाठी राज्यातील विविध ठिकाणचे ४०० ते ४५० स्पर्धक आले होते, स्पर्धेमध्ये काथा व फाईट प्रकारात प्रथम क्रमांक सोहम इथापे, देवांस साळुंखे, अथर्व इथापे, मानस नलावडे, आयुष चव्हाण, ओंकार शिंदे, मृणाली मोहोळकर तसेच द्वितीय क्रमांक दिशा जाधव, सिद्धी पिसाळ, सम्राट माने व तृतीय क्रमांक अवंतिका चव्हाण वरद मोहोळकर यांनी पटकावला. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडूंचे कौतुक करताना अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यामंदिर सातारा, हत्तीखाना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेडगे व उपशालाप्रमुख अजित साळुंखे व शिक्षकांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले.

या सर्व खेळाडूंना विनर्स कराटे असोसिएशनचे संस्थापक संतोष पवार, सातारा शाखेचे प्रशिक्षक निलेश इथापे, अमोल कोरडे, मुंबई शाखेचे प्रशिक्षक किशोरी इथापे, मुक्ताई इथापे यांचे सुद्धा यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here