कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.12मार्च):- श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) हे वर्ष स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शनिवार, दि. 15 मार्च, 2025, सकाळी 11.00 वाजता. कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी मा. सौ. सुनंदा राजेंद्र पवार (वहिनी) विश्वस्त, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील (साहेब) माजी सहकार व पणनमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा जिल्हा, अध्यक्ष, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, कराड, कार्यकारी विश्वस्त, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे अवाहन श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था,कराड, श्री. नंदकुमार लक्ष्मणराव बटाणे उच्च शिक्षण मंडळ, कराड खजिनदार, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड, श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड, प्रा. (डॉ.) श्रीमती स्वाती रामराव सरोदे प्र. प्राचार्य, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांनी केले आहे.




