अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.12मार्च):- गंगाखेड पोलीस ठाण्याच्या समोर गर्दीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून बुधवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान रोड रॉबरी ची घटना घडली असून या घटने मुळे खळबळ उडाली आहे, गंगाखेड येथील एस. बी. आय. बँकेतून काढलेली 03 लाख 88 हजार रोख रक्कम चोरट्यानी पाळवली.
ही घटना माधवराव बालासाहेब शिंदे यांनी एस. बी. आय. बँकेतून काढलेली 03 लाख 88 हजार रोख रक्कम काढली होती व ते एका स्कुटीवर बसून ते बँकेच्या बाहेर पडले, बँके पासून अवघ्या 150 मीटर अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येताच त्यांच्या पाठीमागूम मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी शिंदे यांच्या मानेला झटका देऊन काही स्नात रोख रक्कम असलेली पिशवी पळवली, घाबरलेल्या अवस्थेत माधवराव शिंदे यांनी अगदी जवळ असलेले पोलीस ठाणे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांस झालेल्या घटनेची माहिती दिली, परंतु उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारी कडे नजर अंदाज केल्या मुळे माधवराव शिंदे यांनी माझी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांना पोलीस ठाण्यात बोलावले, व जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी सय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांना मोबाईल द्वारे झालेल्या घटनेची माहिती दिली.
आय. पी. एस ऋषीकेश शिंदे यांनी घटनेचे गंभीर्य ओळखत शहराच्या चारही बाजूस नाके बंदी केली व शेजारी सर्व पोलीस ठाण्याला माहिती दिली.दुपारी दोन ते तीन तास अधिकाऱ्यां ची धावपळ सूरु होती परंतु हाती काही लागले नाही.आय. पी. एस ऋषीकेश शिंदे, पी. एस. आय. सिंगणवाड, यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोरट्यांचा, शोध घेतला पण चोरांचा कोणताही पुरावा हाती लागला नाही.




