Home अमरावती जागतिक महिला दिन पी.आर. पाटील अपंग संस्थेतर्फे संपन्न

जागतिक महिला दिन पी.आर. पाटील अपंग संस्थेतर्फे संपन्न

105

▪️दिपिका दामानी,उषाताई ठुसे, माधुरी जोशी,प्रा.अरुण बुंदेले, ज्योती हंकारे,करुणा लांडगे,उर्वी यावलकर,अलका तालनकर यांची उपस्थिती

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.12मार्च):-पी.आर.पाटील अपंग शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था, देवीनगर,वडाळी तर्फे आयोजित दि. ७ व ८ मार्च रोजी उजंबवाडी मंगल कार्यालय,अंबापेठ येथे जागतिक महिला दिन संपन्न झाला.

महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्हम ग्रुपच्या सुश्री दीपिका दामानी व उद्घाटन श्रीमती उषाताई ठुसे यांनी केले.प्रमुख अतिथी श्रीमती माधुरी किरण जोशी, श्रीमती इला बेन लाठिया,साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले, श्रीमती मेघा टप्पे, श्रीमती उमा कोडिया,दर्शना मेहता,विद्या सिरसाट,वैशाली पावडे,ज्योती हंकारे,श्रीमती करुणा लांडगे,ॲड.उर्वी यावलकर,कवयित्री अलका तालणकर,जया वाघमारे उपस्थित होत्या.

दोन दिवसांच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने दृष्टिहीन महिला सहभागी झाल्या होत्या.यामध्ये श्रीमती ज्योती हंकारे (मुस्कान टीम मुंबई) यांनी महिला ” सक्षमीकरण आणि आरोग्य ” या विषयावर, श्रीमती करुणा लांडगे यांनी ” बालसंगोपन आणि आरोग्य ” या विषयावर विचार तर ॲड.उर्वी यावलकर यांनी ” महिलांचे नियम आणि हक्क ” या विषयावर विचार व्यक्त केले. आणि कवयित्री अलका तालणकर यांनी विनोदी कवितांनी महिलांना खूप हसवले.

प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी ” स्त्रीभ्रूण हत्या आणि लेक वाचवा .” या विषयावर व्याख्यान देऊन ” अपंगांचे जग ” या स्वरचित अभंगाचे गायन केले.

कार्यक्रमात अर्हम ग्रुपने जेवण आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती आणि श्री कैलाशजी जोशी यांनी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. याप्रसंगी दृष्टहीन महिलांना मुस्कान गृप मुंबईतर्फे कुकर भेट म्हणून दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश जोगेकर,दीक्षा जोगेकर, पंजाबराव पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंजाबराव पाटील,संचालन मंदाताई पाटील तर आभार वनिता डोंगरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here