Home महाराष्ट्र अॅड. धनराज वंजारी यांची नोटरी पदी निवड

अॅड. धनराज वंजारी यांची नोटरी पदी निवड

344

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.7मार्च):-केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरीता नोटरी अधिकारी म्हणून अॅड. धनराज पंढरी वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली. ते चिमुर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात मागील 25 वर्षापासुन वकीली व्यवसायात आहेत.

त्यांनी न्यायालयाच्या विविध खटल्यांमध्ये आपल्या पक्षकारांना न्याय मिळवुन दिला आहे. वकीली व्यवसायासोबतच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here