Home चंद्रपूर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाणी व स्वच्छते साठी झटणाऱ्या महिलांचा होणार...

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाणी व स्वच्छते साठी झटणाऱ्या महिलांचा होणार सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा स्तुत्य उपक्रम.

68

 

 

चंद्रपुर (प्रतीनिधी) जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन , उमेद अभियान , ग्राम पंचायत विभाग, ग्रामस्वराज्य अभीयान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयात पाणी, स्वच्छता व आरोग्य पाणी गुणवत्ता संबंधित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी येत्या शनिवारी ८ मार्च रोजी जागतीक महीला दिनी तालुका व ग्राम पंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी व स्वच्छता संबंधित उत्कृष्ट व आदर्श काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली.

जिल्ह्यात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गावे या उपक्रमात सहभागी आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार याही वर्षी जागतिक महिला दिनी सर्व ग्रामपंचायती मध्ये महिलांची स्वच्छतेसाठी विशेष धाव (वॉश रन ) आयोजित करणेत येणार आहे. ज्यामध्ये महिला, बचत गटातील उमेद , किशोरवयीन मुली / विद्यार्थीनी,स्वच्छता कर्मचारी,पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करणेत येत आहे.

सदर दिवशी ग्रामपंचायतीमध्ये पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.

सर्व तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे , ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संचाच्या सहाय्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करणाऱ्या महिला इ.महिलांचा तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित केल्या जाणार आहे. तालुका स्तरावर आयोजित करणेत येणाऱ्या कार्यशाळेत महिला आरोग्य अधिकाऱ्यांचे महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महिलांचा विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. सदर विशेष सत्कार हा पाणी व स्वच्छतेचे व्यवस्थापन करणारे स्वयंसेवी गट, नेते, किशोरवयीन चॅम्पियन, पाणी गुणवत्ता तपासणी तसेच देखभाल दुरुस्ती करणाऱ्या महिला (एफटीके किट वापरून) आणि वॉशच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश करण्यात आला असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

—————————

ब्रॅकेटमध्ये

जिल्हयात जागतिक महिला दिनी राबविण्यात येणारे उपक्रम

● जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसाठी धाव वॉश रनचे आयोजन करण्यात येणार आहे.

● ग्राम पंचायत स्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

करण्यात येणार आहे.

● ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या

अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडी अडचणीबाबत चर्चा विनिमय करणे

● जिल्ह्यात किमान एक महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायती संबंधित मॉडेलची उभारणी करणे

● शाळा व महाविद्यालय यांच्या मदतीने स्थानिक महिला नेतृत्वासोबत गट चर्चा किंवा कथाकथन सत्रे

आयोजित करण्यात येणार आहेत.

● पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेविषयी पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित

करण्यात येणार आहेत.

● मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन तसेच एफटीके किट चाचणी आणि इतर वॉश संबधी नाविन्यपूर्ण

प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

● उमेद अभियान यांच्या मदतीने स्वयं सहाय्य बचत गट यांच्या नेतृत्वाखालील पाणी व स्वच्छता क्षेत्रातील

नाविन्यपूर्ण प्रदर्शन करणारे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here