Home Breaking News बसच्या धडकेत विद्यार्थिनी थोडक्यात बचावली : निर्माणाधिन बसस्टॉपवरील गैरसोयीमुळे मोठय़ा दुर्घटनांची शक्यता

बसच्या धडकेत विद्यार्थिनी थोडक्यात बचावली : निर्माणाधिन बसस्टॉपवरील गैरसोयीमुळे मोठय़ा दुर्घटनांची शक्यता

305

✒️राजुरा(पूरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.6मार्च) :– राजुरा शहरातील जुने बस स्टॉप काढून त्या ठिकाणी नवीन बस स्टॉप निर्मितीचे काम सुरू असून या बसस्टॉप वरील गैरसोयीमुळे मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा, राजुरा येथील कु. नव्या संतोष वांढरे राहणार पंचाळा या शाळकरी विद्यार्थिनीला महामंडळाच्या बसने याच परिसरात वालकंपाऊंड च्या बाजूने जबर धडक देत चिरडत नेले यात ही विद्यार्थिनी जबर जखमी झाली, तीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला जबर मार लागल्याने सी. टी. स्कॅन करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. मात्र आणखी जोराची धडक बसली असती तर त्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू सुद्धा होऊ शकला असता अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरून हे निर्माणाधीन बसस्टॉप नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे दृष्य सामोर येत आहे. 

        दरम्यान बसस्टॉप चे बांधकाम होत असताना कंत्राटदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आवश्यक खबरदारी घेऊन व पर्यायी व्यवस्था करून निर्माण कार्य करण्याची आवश्यकता असते मात्र या ठिकाणी अशा पद्धतीची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वाहतूक पोलीस यंत्रणा अशा ठिकाणी सदैव तैनात ठेवून नागरिकांना संरक्षण देण्याची गरज असते मात्र राजुरा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आणि वरदडीच्या ठिकाणी असलेल्या या बसस्टँड परिसरात अशा पद्धतीची काळजी सुद्धा घेतली जात नसल्याची माहिती आहे.

त्यामुळे आज या अपघातात विद्यार्थी थोडक्यात बचावली असली तरी भविष्य काळामध्ये प्रशासनाच्या कंत्रातदारांच्या व अधिकाऱ्यांच्या भेजबाबदार वागण्यामुळे मोठ्या दुर्घटना होऊन नागरिकांचे जीविताचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या दुर्घटनेनंतर येथे निर्माण कार्य करणारे कंत्राटदार, संबंधित विभागाचे अधिकारी तथा वाहतूक पोलीस यंत्रणा यापासून काय बोध घेणार आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कुठले उपाययोजना अमलात आणणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here