Home चंद्रपूर उज्ज्वल गोरक्षण मधे देशी गोवंश आधारीत नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाला संपन्न

उज्ज्वल गोरक्षण मधे देशी गोवंश आधारीत नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाला संपन्न

89

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27फेब्रुवारी):-येथील श्री उज्ज्वल गौरक्षण केंद्र लोहारा च्या सभागृहात महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग द्वारा सोमवार दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशी गोवंश आधारीत नैसर्गिक शेती विषयावर तालुकास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाला आयोजित करण्यात आली। मार्गदर्शक कृषी विशेषज्ञ दिवाकरराव नेरकरन यांनी सांगितले कि,रासायनिक खतांनी उत्पादित अन्न स्वास्थ्यासाठी घातक आहे। गौमुत्र आणि शेणाने निर्मित खतां द्वारे स्वास्थ्यवर्धक अन्न उत्पन्न होण्या सोबतच अन्नाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते।तसेच नैसर्गिक खत निर्माण करण्यासाठी खर्च ही कमी येतो। नैसर्गिक खतांचा शेतकर्याच्या आरोग्यावर ही वाईट परिणाम होत नाही।

      कार्यशालेच्या अध्यक्षपदी उज्ज्वल गौरक्षण केंद्र लोहार चे अध्यक्ष श्री दीपक पारख होते। लोहाराच्या सरपंच सौ किरण चालखुरे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होत्या।

   सहायक आयुक्त पशुसंवर्धन डा आनंद नेवारे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर डा विनोद रामटेके यांनी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागच्या पशुपालन योजनांची माहिती देऊन आवाहन केले कि, या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी।

अध्यक्ष दीपक पारख यांनी गोसेवा आयोग तथा पशुसंवर्धन विभाग द्वारा उज्ज्वल गौरक्षण केंद्र लोहाराला सहकार्यासाठी आभार व्यक्त करित म्हणाले आमची संस्था शासनाच्या जन कल्याणकारी अश्या योजनांना सहकार्य करत राहिल।

     मुरलीमनोहर व्यास उज्ज्वल गोरक्षण केंद्र लोहारा च्या कार्यांची माहिती देतांना म्हणाले इथे सातशे गोधन आहे। चारा – पाणी, औषध आदि साठी दर माह चार लाख रुपयां पेक्षा अधिक खर्च येतो। व्यासजी म्हणाले लोहारावासीयांनी दुग्ध उत्पादन उद्योग सुरु करुन आर्थिक प्रगती करावी।पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा। उज्ज्वल गोरक्षण संस्था योग्य ते सहकार्य करण्यासाठी तैयार राहिल।      

       जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डा मंगेश काले आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डा उमेश हिरुडकर यांच्या मार्गदर्शनात कार्यशालेचे सफल आयोजन संपन्न झाले। संस्थेचे सचिव आनंद देशपांडे ( सी ए ) कमल किशोर राठी ( सी ए) , हिम्मतभाई शाह, प्रा डा जुगलकिशोर सोमाणी, दिनेश बजाज, मुरलीमनोहर व्यास, हेमंत बुट्टन, मेहुल सचदे आदिंनी विशेष परिश्रम केले। लोहारा च्या सरपंच तथा ग्रामवासीयांनी चे सहकार्य प्राप्त झाले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here