Home महाराष्ट्र प्राथमिक आरोग्य केंद्र आमनेर येथे क्षयरोग जनजागृती अभियान !

प्राथमिक आरोग्य केंद्र आमनेर येथे क्षयरोग जनजागृती अभियान !

130

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.27फेब्रुवारी):- प्राथमिक आरोग्य केंद्र आमनेर व ग्राम पंचायत यांच्या वतीने क्षयरोग मुक्त ग्राम पंचायत करण्याकरिता आमनेर गावामध्ये क्षयरोग जनजागृती करिता जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. क्षय रोग हा एक जिवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जात होता.

१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, असे मत आरोग्य सेवक ओंकार निमजे यांनी व्यक्त केले. 

यावेळी सरपंच निलेश घारगे, आरोग्य सेवक ओंकार नीमजे, आरोग्य सहाय्यक कुलदीप रुद्रकार, आशा सेविका माधुरी मंडोकर, राबिया शेख, रुखामा ठोंबरे, रंजना राकेश, तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते. तसेच आमनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निकिता सूरजुसे, व डॉ अर्चना डहाके यांनी गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here