Home अमरावती व्ही एम व्ही च्या पश्चिम वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी विदर्भोत्सवातील गौळणीच्या पैशातून उभारली पाणपोई

व्ही एम व्ही च्या पश्चिम वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी विदर्भोत्सवातील गौळणीच्या पैशातून उभारली पाणपोई

89

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.27फेब्रुवारी):- शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. सदर स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

21 फेब्रुवारी रोजी “आनंद मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रुचकर आणि चविष्ट पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या चविष्ट पदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला. महाविद्यालयातील अप्सरा उद्यान जणू आनंदनगरीच बनले होते. याच आनंदनगरीमध्ये पश्चिम वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी गवळण काढली होती. या गवळणी कडे सर्वांचेच लक्ष आकर्षिले गेले. “दही लो दूध लो , हमारी गवळण जाने।” अशाप्रकारे घोषणा देत उपस्थित शिक्षकांना घेरा घातला होता. व बक्षीस म्हणून शिक्षकांनी पैसे दिले होते तर याच पैशातून काहीतरी सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवायचा असा विचार वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी घेतला.

त्या अनुषंगाने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून सार्वजनिक पाणपोई वस्तीगृहाच्या समोरील झाडाखाली बसवली. हा एक कौतुकास पात्र ठरणारा उपक्रम आहे. बक्षीस म्हणून मिळालेले पैसे स्वखर्चासाठी न वापरता “जल ही जीवन है” या सुविचाराप्रमाणे सार्वजनिक पाणपोई सुरू करावी असा विचार मनात घेऊन तो विचार प्रत्यक्षात उतरवण्यात पश्चिम वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना यश मिळाले. त्यांच्या या कार्याचे महाविद्यालयाचे संचालक तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here