भाजप सरकार अनावश्यक कर सक्तीने वसूल करते. रोड टॅक्स आणि टोल टॅक्स दोन्ही घेते. दर सहा महिन्यांनी हे बनवा, ते बनवा सांगते. नाही बनवले तर तीनपट दंड करते. कधी आधार कार्ड, कधी पॅन कार्ड, कधी केवायसी अपडेट करायला सांगते. आता तर म्हणे नवीन नंबर प्लेट लावा. नाहीतर हजार रूपये दंड. मोदींच्या अंगात औरंगजेबाचे भूत संचारलेले दिसते. झिजीया करापेक्षा जीएसटी जास्त!
हे सगळे खरेच आहे. पण त्यासाठी भाजप व मोदींना विरोध केला पाहिजे. जो बलात्कार करतो त्याचीच नवरा म्हणून निवड केली जाते.
जर सरकारने असे लुटमार धोरण ठेवले आहे तर आमदार भोळे आणि खासदार वाघ यांचेकडे तक्रार केली पाहिजे.
“का रे! तुमचे सरकार आमची लुटमार करीत आहे. आणि तुम्ही गप्प का?”
हा माझा संताप आहे. पण जळगाव शहरातील जिल्ह्यातील लोक भाजप ला मतदान करतात. ज्यामुळे मोदी प्रधानमंत्री बनतात. ते मतदारांचे शोषण करतात. ये रे सांड, शिंग घाल! जर सांड माजावर आला आणि शिंग घातले तर कोणाला सांगणार आहात?
किमान सांडाला विरोध तर केला पाहिजे. नाही हिंमत तर जो विरोध करतो त्याला साथ तर दिली पाहिजे. पण तसे होतांना दिसत नाही.
एका बाईवर बलात्कार झाला. तिने निनावी एफआयआर नोंदवली. पोलिसांनी तपास करून आरोपी पकडला. कोर्टात उभा केला.
न्यायाधीशांनी विचारले,
“हेच का ते , ज्यांनी तुझ्यावर बलात्कार केला?”
तेंव्हा ती पिडीत बाई सांगते,
“हो साहेब! पण यांचे आणि माझे प्रेम संबंध आहेत.”
न्यायाधीश म्हणाले, “अहो बाई हेच का ते?”
ती म्हणते, “हो!हेच ते. पण यांचे आणि माझे प्रेम संबंध आहेत.”
न्यायाधीश पुन्हा विचारतात, “तुमच्यावर बलात्कार झाला?”
“हो!”
“तुम्हाला त्रास झाला?”
“हो साहेब! अजून होत आहे “
“तर मग त्याला शिक्षा देऊ कि नको?”
“नको साहेब!”
“का नको देऊ?”
“साहेब, यांचे आणि माझे प्रेम संबंध आहेत.”
“हो! प्रेम संबध आहेत तर मग तक्रार का केली?”
“साहेब, मला त्रास झाला आहे. अजून होत आहे.”
“अहो बाई, म्हणून तर मी शिक्षा देऊ कि नको?”
“नाही साहेब! यांना शिक्षा देऊ नका. कारण यांचे आणि माझे प्रेम संबंध आहेत.”
“मग मी कोणाला दोषी ठरवू?कोणाला शिक्षा देऊ?”
“ज्यांनी बलात्कार होतांना पाहिला त्यांना शिक्षा दिली पाहिजे.”
“का?”
“जर त्याने पाहिले नसते तर मी तक्रार केलीच नसती.”
“का?”
” यांचे आणि माझे प्रेम संबंध या पाहाणाऱ्या माणसामुळे उघड झाले आहेत. म्हणून मी बलात्कार केला अशी तक्रार केली आहे. नाहीतर केलीच नसती.”
“सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आदेश दिला कि, ज्यांनी हा बलात्कार पाहिला त्यांचेवर ताबडतोब गुन्हा नोंदवण्यात यावा. त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात यावे.कोर्ट इज अडजर्न फॉर ट्वेंटी इयर्स!”
शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२




