Home महाराष्ट्र सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव

सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव

108

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.27फेब्रुवारी):- सहकार क्षेत्रात काम करतांना सर्वाना सोबत घेऊन व शहरातील सर्व पतसंस्थेचा व्यवस्थापकांना वेळोवेळी तांत्रिक अडचणी ची माहीती देऊन सहकार्याची भुमीका जोपासणारे सुशिल गुजराथी यांचा कार्याचा गौरव करतांना त्यांचे सहकार क्षेत्रातील केलेल्या सर्व समावेशक कार्याचे मोठे योगदान असुन त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भावनात्मक प्रतिपादन विविध मान्यवरानी व्यक्त केले

नुकताच येथील स्वामी विवेकानंद नागरिक सहकारी पतसंस्थेत दि अर्बन बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न झाला त्या प्रसंगी शहरातील सर्व पतसंस्थेचा विविध मान्यवरानी त्यांनी केलेल्या सर्व समावेशक कार्याचे कौतुक केले व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला

  त्या प्रसंगी छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन अँड व्हि.एस.भोलाणे हे होते तर व्यासपीठावर व्यंकटेश पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले,हिंगलाज माता पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश मकवाणे हे उपस्थित होते 

नुकताच येथील स्वामी विवेकानंद पतसंस्था, जनकल्याण नागरी पतसंस्था,व्यंकटेश नागरी पतसंस्था,श्री बालाजी नागरी पतसंस्था,महावीर को -ऑप क्रेडिट सोसा,यशवंत को-ऑप बॅक,हिंगलाज माता पतसंस्था महात्म्या फुले पतसंस्था सह शहरातील सर्व पतसंस्थेचा वतीने

दि अर्बन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभाचा कार्यक्रम विवेकानंद पतसंस्थेचा सभागृहात संपन्न झाला त्या प्रसंगी ऑडव्होकेट व्हि.एस.भोलाणे, गणेश रावतोळे,प्रविण येवले,कमलेश तिवारी,डाॅ अरुण कुळकर्णी,महेश आहेराव,यांनी आपल्या मनोगतातुन श्री गुजराथी यांचे दि अर्बन बँकेचे सेवा कार्याचे कौतुक केले व बॅकेचे काम करतांना देखील त्यांनी ठेवीदारा पासुन तर कर्जदारा पर्यंत समन्वय साधतांना बॅकेचा पैसा बुडायला नको व कर्जदाराची देखील वेळेवर परत फेड कशी होईल यांचे तारतंम्य साधुन बॅकीग क्षेत्रात मोठे कार्य उभे केले असल्याचे नमुद करून सर्वानी भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देतांना श्री गुजराथी यांनी सर्व पतसंस्थेचे व चेअरमन व संचालक मंडळाचे आभार मानुन बॅकीग क्षेत्रातील कामाचे अनुभव सांगीतले ते म्हणाले की माझा कार्यकाळात बॅकीग क्षेत्रात अनेक बदल झाले नव नविन साफ्टवेयरचा माध्यमातून बॅकेचे कामकाज करतांना अनेक कर्मचारीना अडचणीचा सामना करावा लागत असे व व्यवस्थापक असतांना रिझर्व बैंकेचा चौकटीत काम करतांना कायद्यात देखील अनेक बदल झाले व त्यातच 1994 साली एन पी ए लागु झाल्यावर बॅकीग क्षेत्रातील अनेक विषय समोर आल्याने कामाचा लोड देखील वाढला तरी आपण सर्व कर्मचारीचा सहकार्यात मार्ग काढुन सहकारात टिकुन राहीलो असा आशावाद व्यक्त करुन त्यांनी त्यांचा कार्य काळातील सर्व चेअरमन व संचालकाचे मला कायम सहकार्याची भुमीका असल्याची जाणीव करून दिली व आपण सर्वाना बॅकीग क्षेत्रातील काही तांत्रिक अडचण आल्यास मी पुर्ण सहकार्य करु यांची ग्वावी देखील दिली व असेच प्रेम कायम असु द्या असे भावात्मक आवाहन केले

सर्व प्रथम विवेकानंद पतसंस्थेचे व्यवस्थापक वासुदेव महाजन नियोजीत कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली तर व्यंकटेश नागरिक सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक किरण वाणी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.तर आभार जनकल्याण नागरिक पतसंस्थेतेचे व्यवस्थापक दिपक चौधरी यांनी आभार मानले त्या प्रसंगी शहरातील विविध पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व कर्मचारी वृंद उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here