Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये 24 फेब्रुवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये 24 फेब्रुवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार

82

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.21फेब्रुवारी):-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे वार्षिक पारितोषिक समारंभ सोमवार, दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मा. प्रा.डॉ.ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के, (कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) यांच्या शुभहस्ते व मा. श्री अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ,कराड) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 

   सदर समारंभात शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या यशवंत, गुणवंत व कलावंत विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे.

     या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका), मा. श्री. नंदकुमार बटाणे, मा. डॉ. अशोकराव डूबल, मा. श्री. भास्करराव कुलकर्णी, मा. श्री. दिलीपभाऊ चव्हाण, विश्वस्त व सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन वेणूताई चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here