Home महाराष्ट्र चिमूर रोटरी क्लबने केला खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान

चिमूर रोटरी क्लबने केला खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान

145

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19फेब्रुवारी):-जागतिक रोटरी क्लब सप्ताह अंतर्गत रोटरी क्लब चिमूर द्वारा विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाचा भाग म्हणून महिला सशक्तीकरण या उपक्रमांतर्गत चिमूर शहरामध्ये खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

चिमूर शहरामध्ये अनेक वर्षापासून पोटाची भूक भागविणारी झुणका भाकर केंद्र संचालिका अकीला कादिर शेख आणि पंचायत समिती परिसरातील मेहरूनिसा शेख चाची तसेच बसस्थानक परिसातील दक्षिण भारतीय इडली डोसा केंद्र संचालिका अनिता बोरकर व स्प्रिंग पोटाटो केंद्र संचालिका दिपीका निखाते यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

  यावेळी रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष विशाल गंपावार, कोषाध्यक्ष पवन ताकसांडे, प्रकल्प प्रमुख डॉ. महेश खानेकर, वैभव लांडगे, प्रफुल बेत्तावार, आदित्य पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here