अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):- शहरातील लॉर्ड वेंकटेश्वरा मंदिर परिसर नवीन मार्केट यार्ड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान स्वदेशी आखाडा गंगाखेड यांच्या वतीने ३ दिवसीय सूर्य नमस्कार अभियान व योग प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराची सुरुवात दिनांक 17 फेब्रुवारी पासून झाली आहे.
तीन दिवस पहाटे पाच ते साडे सहा वाजेपर्यंत योग प्राणायाम सूर्य नमस्कार आसने त्यानंतर जिजाऊ वंदना शिव वंदना श्रींची आरती गारद शंख नाद होणार असून शिबिर दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वदेशी आखाड्याचे संस्थापक योगगुरु प्रकाश डीकळे यांनी केले आहे




