Home महाराष्ट्र भांडे तांब्याचे कि पितळाचे?

भांडे तांब्याचे कि पितळाचे?

71

आपण सभ्य लोक आमदार खासदार मंत्री ची लेव्हल खूप उंच समजतो.तो चोर, बदमाष असला तरीही उठसूठ त्याला सन्मान देतो.त्यामुळे त्याचा गैरसमज होतो कि,मी चोरी करतो, यांना काहीच कळत नाही.चोरापुढे सभ्यता म्हणजे आपला दुर्गुण ठरतो.

माझा अभ्यास आहे कि घरमालक जागा आहे,तो पाठलाग करू शकतो,तो पकडून मारहाण करू शकतो अशी भीती चोराला असली तर तो घाबरतो.तसाच आपण नागरिक जागृत असणे,चोर आमदार खासदार मंत्री ला अपमानित करणे हाच तुर्त इलाज आहे.

उदाहरण देतो.पुर्वी महिलांवर कोणीही अत्याचार करीत असत.त्या तक्रार करीत नसत.आता महिला धीट झाल्या तर असे अत्याचार कमी झाले.उलट काही महिला पुरूषांवर अत्याचार करायला सरावल्या आहेत.असेच धीट सामान्य नागरिकांनी झाले पाहिजे.

आपण सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेतो.तेंव्हा सुद्धा चोर पुढाऱ्यांचा अनावश्यक अनुनय करू नये.मुंबई,पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरातील नागरिक खूप जागृत असतात.आमदार खासदार मंत्री पेक्षा जास्त ज्ञानी असतात.म्हणून ते धाडसाने बोलतात.तेथे निवडणुकीतून सत्तेत बदल होत असतात.मुंबई, दिल्ली, बंगलोर, कलकत्ता शहरातून राजकीय बदल झाले आहेत.जळगांवला तसे बदल होत नाहीत.जळगांव अशिक्षित,अडाणी, भयग्रस्त लोकांचे शहर आहे.

ग्रामीण भागात अजूनही असे राजकीय बदल होत नाही.नागरिक नेहमीच याचक,दिनवाणी मानसिकतेत असतो.शिवाय हक्काची माहिती नसते.त्यात भर म्हणून फुकटचे मिळाले तर घेतो.जसे आता महिलांनी साडी भांडी घेतली.तर ते देणाऱ्या बेवड्याला भाऊ समजतात.पुण्यवान समजतात.म्हणून ते बेवडे, चोर, बलात्कारी उमेदवारांना मतदान करतात.

उच्चशिक्षित लोक या प्रकारामुळे नाराज होतात.उदास होतात.निवडणुकीत लाभ लोभ ठेवत नाहीत.मतदान ही करीत नाहीत.याचा गैरफायदा चोर उमेदवार आणि अडाणी मतदार घेतात.तर मग पांच वर्षे दुषणे देऊन काय उपयोग? मतदान केले किंवा नाही केले तरीपण कर भरावाच लागतो.मतदान केले नाही म्हणून करात सुट मिळते का? कर न भरणारे ,फुकट खाणारे मतदान करतात.कर भरणाऱ्याने मत न देऊन आर्थिक शोषण थांबणार आहे का?शोषणाला पाठमोरा होऊन शोषण थांबत नाही.

माझा उद्देश आहे कि भांड्याला दोन चार ठोका मारल्याशिवाय कल्हई उतरत नाही.तशीच कल्हई राजकीय चोरांची उतरवली पाहिजे.

तरूणानो, तुम्हाला नोकरी नाही.कामधंदा नाही.तुम्हाला दारू मटण, पैसा देऊन तुमची वाट्याची संपत्ती कोणी लुटली आहे?याची माहिती घ्यावी. चर्चा करावी.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here