Home महाराष्ट्र प्रयत्न, सातत्य, आत्मविश्वास ही यशाची त्रिसूत्री-श्रीमती दिपाली चौगुले

प्रयत्न, सातत्य, आत्मविश्वास ही यशाची त्रिसूत्री-श्रीमती दिपाली चौगुले

72

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.15फेब्रुवारी):-“प्रयत्न करा, यश मिळेल. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, याचा योग्य वापर करा. तसेच अपयशाने खचून जाऊ नका, आपण यश प्राप्त करू शकतो यावर विश्वास ठेवा, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शिक्षकांचा आणि महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे. शिक्षकांचे ऐका, त्यांना फॉलो करा, तसेच या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान मला आहे.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मा. श्रीमती दिपाली चौगुले (डेप्युटी कमिशनर, महाराष्ट्र राज्य जीएसटी विभाग सांगली) यांनी केले. त्या कासेगाव  एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर आयोजित मा. आमदार श्री.  जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा- 2025” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. टी. जे. शिंदे हे होते. ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “गेली सतरा वर्षे हा उपक्रम सुरू असून महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थांनी यात सहभाग घेतला आहे.  लेखन, वाचन, श्रवण यामुळे आपले वक्तृत्व समृद्ध तर होतेच  याचबरोबर आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत होते. व व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते.” 

      या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  बक्षीस वितरणसमारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. शामराव पाटील (सदस्य, साहित्य व सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते. त्यांनी संस्थेतील वक्तृत्व स्पर्धेचा आढावा घेताना मा. आमदार श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या जीवनातील काही गोष्टींना उजाळा दिला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

          सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. प्रीती प्रमोद लोळगे (शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर), द्वितीय क्रमांक कु. शांभवी श्रीकांत माळकर (श्रीमती पद्मराजे न्यू कॉलेज, शिरोळ), तृतीय क्रमांक कु. ऋतुजा सतीश पवार (डी. के. टी. ई. कॉलेज, इचलकरंजी), उत्तेजनार्थ एक कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली),तर  उत्तेजनार्थ दोन श्री. चैतन्य श्रीकांत लांडगे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉलेज) या स्पर्धकांनी विजय प्राप्त केला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. संतोष बोंगाळे (मराठी विभाग प्रमुख, वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड), प्रा. डॉ. प्रकाश आठवले (हिंदी विभाग प्रमुख, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर) व प्रा. डॉ. रेखा फसाले (मराठी विभाग प्रमुख, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव) यांनी कार्य पाहिले.

         या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. विकास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. जी. बी. मासाळ, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. अमित बामणे, डॉ. दीपक पाटील, डॉ. युवराज केंगर, डॉ. सुरेश साळवे, डॉ. सुजाता पाटील, प्रा. नंदा चिवटे, प्रा. सुलोचना दंतराव, डॉ. आण्णा कदम, प्रा. संदिप माने, प्रा महेश पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. संजय पवार, प्रा. शहिदा आतार, प्रा. हर्षदा चव्हाण, प्रा. सविता सुतार, प्रा. राधा गोसावी उपस्थित होते.

        उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित बामणे, प्रा. लता ऐवळे यांनी केले तर आभार डॉ. अनिल साळुंखे यांनी मानले तसेच समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन डॉ. सुरेश साळवी, प्रा. राधा गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सविता सुतार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here