Home यवतमाळ राळेगाव येथे भोई समाज वधु-वर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान संपन्न

राळेगाव येथे भोई समाज वधु-वर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान संपन्न

220

 

सुनील शिरपुरे/यवतमाळ

महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना यवतमाळचे वतीने राळेगाव येथे भोई समाज वधु-वर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या वधुवर परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून माजी शिक्षणमंत्री मा.श्री.वसंतराव पुरके, अध्यक्षस्थानी भोई समाज महासंघाचे अध्यक्ष श्री.राजेन्द्र पारीसे, प्रमुख अतिथी म्हणून श्री.नंदुभाऊ पडाल नगर सेवक, सौ.वंदनाताई दाते माजी पं.स.सदस्य वरोरा, सामाजिक कार्यकर्त्ते श्री.राजारामजी मात्रे, किरण पारीसे, राजुभाऊ लांडगे, वासुदेवराव नेमाडे, अशोकराव मोरे, एकनाथजी राऊत, मधुसूदन कोवे, शिवशक्ती भिमशक्ती जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण घरडे हे उपस्थित होते. उद्घाटन करताना माजी शिक्षणमंत्री श्री.वसंतराव पुरके म्हणाले की, भोई समाजावर होणा-या अन्यायावर मात करण्यासाठी सदैव भोई समाजासोबत आहो. समाजाच्या विकासासाठी समाजातील तरुणांनी शैक्षणिक प्रगती करून समाज संघटीत करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यामध्ये एकूण शंभर मुलामुलींनी आपल्या परिचयासाठी नोंदणी केली. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय एका पाच वर्षाच्या मुलीचे गोजिरी सचिन चाचरकर ( नागपूर ) कराटे या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केल्यामुळे तिचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे सुत्र संचालन व प्रास्ताविक अध्यक्ष श्री मारोतराव पडाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री महादेवराव वाघाडे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्याकरीता युवा नेता राहुल पडाळ, परसरामजी करलुके, सुनील पारीसे, हनुमानजी सातघरे, राजू मन्ने, शरद पारीसे, प्रमोद पडाळ, प्रमोद पोहनकर, चिंधु सातघरे, पांडुरंग नान्हे, अनंता पारीसे, रामभाऊ पारीसे, चंद्रकला पचारे, रमेश पारीसे, सौ.गिता पडाळ, दुर्गादास कापटे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here