अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात राहणारे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या कार्यालयात जाऊन गुंड प्रवृत्तीच्या नराधमाने मारहाण करत दहशत निर्माण केल्या प्रकरणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करत गंगाखेड युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे कारवाही मागणी केली आहे.
भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारिता करत असताना प्रसाद पिसाळ यांच्या हल्ल्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निषेध व्यक्त होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशः लक्ष घालून हल्ला करणारे गावगुंड यांच्यावर ताबडतोब पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत कारवाई झाली पाहिजे.अन्यथा पत्रकार बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन नाही करण्यात येईल असे निवेदनावर कळविले आहे.निवेदनावर युवक काँग्रेसचे शिदोधन भालेराव, पत्रकार सुभाष शिंदे,वामनराव ढोबळे, राहुल साबणे,मेहमूद शेख, रोहिदास लांडगे,देवराव जंगले,वसंत ढोबळे सिद्धार्थ हत्ती आंबिरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




