Home यवतमाळ बालाजी ऍग्रो एजन्सीच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई जयंती साजरी

बालाजी ऍग्रो एजन्सीच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई जयंती साजरी

164

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

 

पुसद -येथील बालाजी ऍग्रो एजन्सीचे संचालक दिगंबर वसेकर व रामेश्वर चव्हाण यांनी त्यागमूर्ती माता रमाईची १२७ वी जयंती आपल्या दुकानात मोठ्या उत्साहात साजरी केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष,माजी सैनिक भारत कांबळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष अर्जुन भगत,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव,भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा संघटक ल.पु.कांबळे तसेच मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथम त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी भारत कांबळे यांनी दिगांबर वसेकर व रामेश्वर चव्हाण यांना तथागत बुध्द आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सन्मानित केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे , समता सैनिक दलाचे सर्वसैनिक, प्रज्ञापर्व समितीचे पदाधिकारी मंडळी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भोलानाथ कांबळे यांनी केले तर आभार रामेश्वर चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here