अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.4फेब्रुवारी):-शहरातील कै सौ शेषाबाई मुंढे महाविद्यालयात घरकाम करणाऱ्या असंघटित महिलांना मदतीचा हात या योजनेअंतर्गत मोफत ब्लॅंकेट (चादर) वाटप करण्यात आले. या प्रसंगी महिला कामगारांच्या विविध समस्या व व्यथा जाणून घेण्याची संधी महाविद्यालयास मिळाली. या कार्यक्रमात गरजूवंत 25 महिला कामगारांना मोफत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
महिला कामगार आपल्या स्वतःचे कुटुंब सांभाळून ज्यांच्या घरी ते काम करतात त्यांच्याही कुटुंबाला ते आधार देतात त्यामुळे अशा कुटुंबाने त्यांना कुटुंबातील सदस्या प्रमाणेच वागणूक दिली पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी ढाकणे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ रेखा बने, प्रास्ताविक प्रा डॉ अशोक केंद्रे, आभार प्रा डॉ सुभाष यादव यांनी माणले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा डॉ राजीव आहेरकर,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




