Home महाराष्ट्र आनंददायी शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानदात्याला बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न….

आनंददायी शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानदात्याला बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न….

163

 

जिंतूर (प्रतिनिधी- सौ. अश्विनी जोशी) शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहुन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला आनंद मिळावा. शिक्षक आनंदात असतील तरच ते विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने अध्यापन करू शकतील अशी धारणा असणाऱ्या गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी ज्ञानदात्याच्या आनंदासाठी बुधवार दिनांक 29/01/2025 रोजी शिक्षकांसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनासाठी विद्या व्हॅली इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती प्रिया देशमुख मॅडम यांनी मोठे सहकार्य केले. तसेच तालुका क्रीडा प्रशिक्षक शाहरुख शेख व हर्षराज भेरजे यांचेही मोठे सहकार्य लाभले.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करणे सुरू आहे. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयी झालेल्या विद्यार्थी, शिक्षकांना वेळोवेळी गौरविण्यात येत आहे. कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविण्यात येत आहे. वेळोवेळी चांगले कार्य करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रेरित केल्या जात आहे.

दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ध्येय मनात ठेवून प्रेरित झालेले हे विद्यार्थी आणि शिक्षक जिंतूर तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हसत-खेळत, आनंदायी वातावरणामध्ये एक शैक्षणिक चळवळ जिंतूर तालुक्यात निर्माण झाली आहे. यासाठी सातत्याने जिंतूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले प्रयत्नशील असतात. सर्व विद्यार्थी आपल्या शाळेत टिकले पाहिजेत…. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिंतूर शिक्षण विभाग सातत्याने विविध उपक्रम, कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करत आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांच्या निखळ आनंदासाठी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या बॅडमिंटन स्पर्धेला शिक्षकांमधून प्रचंड प्रतिसाद लाभला. जिंतूर तालुक्यातील 38 शिक्षकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. सहभागी सर्व शिक्षकांनी आपल्या परीने प्रौढ वयातही आपल्या खेळप्रियतेचे, खेळाडूवृत्तीचे आणि चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. ही बॅडमिंटन स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात आयोजित करण्यात आली.

स्पर्धा पार पडत असताना… प्रत्यक्ष खेळत असताना… शिक्षक खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या सामन्यांचे फलित लक्षात आले. यानिमित्ताने सर्व शिक्षक परिवार एकत्र आला. त्यांची एकमेकांशी चर्चा झाली. सुसंवाद घडून आला. बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने अटीतटीचे, चूरशीचे क्षण पाहायला मिळाले. सर्वांना खळखळून हसण्याचा आनंद मिळाला. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परस्परांचे ऋणानुबंध दृढ करण्याची संधी मिळाली. असे विविध हेतू साध्य करणाऱ्या तालुकास्तरीय शिक्षकांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांचे सर्व शिक्षकांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धेच्या आयोजन कार्यामध्ये स्वतः गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, माधव साळापुरीकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, सुभाष आमले, मंगेश नरवाडे, नवनीत देशमुख, रावसाहेब कातकडे, नारायण मुंडे, केंद्रप्रमुख मारुती घुगे, संजय स्वामी, हर्षराज भेरजे, दिनकर चौधरी, राधेश्याम वाढवे, सुनील फड, अरुण सोनुने, विष्णू शिंदे, शिवाजी कऱ्हाळे, शंकर माने, मयूर जोशी, प्रमोद बोरकर, हिरामण वाघमारे, नवनाथ तळेकर, रौफ पठाण, उत्तम बुरकुले, गजानन धनवे, प्रवीण भिसे, प्रसाद कोंडेकर जगदीश चिंचोले, सचिन हजारे, अमोल सोनटक्के, संतोष चिभडे, मनीष सावळे, मुकेश देशमुख, संदीप आंबेकर, अजय गडदे, उमेश डोंगरे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here