Home महाराष्ट्र सीएसआर फंड अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप

सीएसआर फंड अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप

232

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

 गंगाखेड(दि.29जानेवारी):-गंगाखेड शहरातील सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी केंद्र शासनाच्या सीएसआर फंड अंतर्गत पर्यावरण फाउंडेशन यांच्या सहाय्याने व गंगाखेड येथील श्री मुक्तेश्वर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड शहरातील महिलाना रोजगार मिळावा यासाठी दुसऱ्या बॅचच्या महिलांना वीस शिलाई मशीनचे वाटप आले.   या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतुल तुपकर, पवन शिंगोटे, सोमेश्वर दामा, शेख जावेद, गोविंद अय्या,शेख इरफान, धोंडी शेटे, अधिराज साळवे, सुनील कांगणे, गजु गिरि, वैशालीताई आदी उपस्थित होते. 

  या योजनेमध्ये 18 ते 45 वयोगटातील महिलांना चार दिवसीय प्रशिक्षण देऊन 25% अनुदानावर सी एस आर फंड अंतर्गत गंगाखेड शहरात राबविण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दुसऱ्या तुकडीच्या वीस महिलांना सारडा कॉलनी येथील कार्यालयात शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी महिलांनी संस्थेचे पवन शिंगोटे मो. 8623823111, 7507874460, गजानन गिरी मो. 8888340633, शेख जियाउलहक्क(जऊ) बेलदार मो. 9604297865 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here