अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.27जानेवारी):-विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय संस्था येरला,ता. मोर्शी,जि.अमरावती द्वारा संचालित जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मोर्शी येथे दि.26 जानेवारी 2025 ला प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.
७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहासराव ठाकरे (अध्यक्ष,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय संस्था,येरला),प्रमुख अतिथी संस्था कोषाध्यक्ष श्री.एस. एस.राऊत,श्री.विजयराव शिरभाते,प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई,श्री.राजाभाऊ बेले,श्री. दिलीपराव भूतकर,श्री. विलासभाऊ तंतरपाळे,श्री.एस. व्ही.सबाने,श्री.पी.आर.पाटील,श्री. ठोंबरे साहेब होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहासराव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून श्री सुहासराव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले ,प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई यांनी व प्रमुख अतिथी श्री विजयराव शिरभाते यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीम व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.
याप्रसंगी कलाध्यापक मंडळ पुणे तर्फे ” राज्यस्तरीय कलाश्री पुरस्कार ” शाळेतील कलाशिक्षक श्री.आनंद महादेवराव गावंडे यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तथा निवडणूक आयोगातर्फे मतदार दिनाचे औचित्य साधून मा. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निवडणूक विषयक विविध कर्तव्य पार पाडल्याबद्दल व मतदार जागृती केल्याबद्दल BLO यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल करून सत्कार केल्याबद्दल सहा.शिक्षक श्री जयंत शामरावजी सराटकर यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी सत्कार केला.
याप्रसंगी कु.वंशिका गजानन काळेचा सानेगुरुजी वाचन प्रेरणा प्रकल्पामध्ये अमरावती विभागात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तथा सानेगुरुजी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल,रेशन शेख शाबीर सौदागरला सानेगुरुजी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल,एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत कु.नंदिनी संजय बघेल, कु.मनश्री रवींद्र ढोंगे यांचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन कु. व्ही .ई. कानबाले व प्रा.कु.यु. बी.ढोकणे तर आभार प्रा.आर. जी.कोटांगळे यांनी मानले .
कार्यक्रमाला श्री शैलेश ठाकरे सर व श्री जयंत सराटकर सर,कु.ज्योती पी.पद्मने ( बुंदेले ),कु. व्ही .ई. कानबाले, कु.एस. वाय. अजमिरे,श्री ए.एम. गावंडे,कु.एस.जी.गाडगे,श्री.बी.एन. भारती, प्रा.कु.यु. बी.ढोकणे,प्रा.डी.बी.जावळे,प्रा.आर.जी.कोटांगळे,प्रा.कु.पी.एस.विरखरे,प्रा.कु.एस.एल.राठोड तथा शिक्षकेतर कर्मचारी श्री डी.ए. तंतरपाळे,श्री.एम.एन.गोमकाळे श्री एन.जी.चौधरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.




