Home महाराष्ट्र इतिहासात प्रथमच आज सांस्कृतिक कार्यक्रम झाला

इतिहासात प्रथमच आज सांस्कृतिक कार्यक्रम झाला

82

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.27जानेवारी):- गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरी. ता: गंगाखेड जि: परभणी* येथील प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात संपन्न झाला. खूप सुंदर विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत आपली मनोगत व्यक्त केली. अनेक देशभक्ती गीत नृत्य, व इतर सामाजिक संदेश देणारी नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण जमिनिवरती भारतमातेची स्केच रांगोळी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा कु. सिद्धार्थ विजयानंद घोबाळे (इयत्ता – पहिली) आणि महात्मा गांधीजी यांची वेशभूषा कु. हर्षद मुंडकर याने साकारली

होती.1ते 5 वर्गातील जेमतेम 20-21 विद्यार्थी संख्या, लाजरी-बुजरी, बऱ्याच प्रयत्नानंतर पोरं अशी मोकळी नाचली की ते पाहून डोळ्याचं पारणं फिटलं अशी लोकांची प्रतिक्रिया होती. शाळा रस्त्यावर असल्याने जाणारी-येणारी दुसऱ्या गावची मंडळी पण गाडी थांबवून कार्यक्रम पाहू लागली . हेच आमचं यश मुख्याध्यापक श्री भोसले सर आणि मी दोघांनीच अगदी सगळीच भूमिका (ड्रेसिंग to अँकरिंग आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग) निभावताना मला दमछाक व्हावं लागलं. पण कार्यक्रम असा भन्नाट झाला त्यामुळे शीण कधी गेला कळलंच नाही. 

पण आवर्जून अभिमानानं सांगावसं वाटतं की हा इतका मोठा यशस्वी कार्यक्रम हा आदरणीय श्री. संजयजी पैठणकर सर यांच्या अमूल्य आशा देणगीमुळे हे स्वप्न साकार झाले आहे . सरांच्या मदतीमुळेच आम्ही सांउंडबॉक्स आणि स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही घेऊ शकलो. अन्यथा हा शाळेच्या इतिहासातील पहिला सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता. पैठणकर सर आपण केलेली मदत ही खूप खूप मोठी आहे. सरजी, श्री संजय पैठणकर हे मूळ मुंबईचे असून फक्त माझे फेसबुक आणि वॉट्सअप्प friend आहेत आम्ही एकदाही भेटलो नाहीत. 2-3वेळा फोन वरती बोललो आहोत. फक्त त्यांनी माझे पेपरमधील लेख वाचून व्हाट्सअप्प गटातील शाळेच्या कामाच्या पोस्ट वाचून व माझे काम पाहून मदत केली आहे. पांगरीच्या ता- गंगाखेड शाळेसाठी 25000 रुपये रोख त्यांनी देणगी दिली असून . या पूर्वी माझी जुनी शाळा जिंतूर या ठिकाणी असता त्यांनी रोख रक्कम 25000 व 30000 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट दिले होते . अजून बरीच मदत केली आहे. मागील 5-6 वर्षांपासून व्हाट्सअप्प व फोनवरून संपर्कात आहोत. एकमेकांची ओळख नाही .तरी हा सोशल मीडियाचा छान उपयोग झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here