Home चंद्रपूर राणी दुर्गावती शासकीय औ. प्र. संस्था (मुलींची) येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न

राणी दुर्गावती शासकीय औ. प्र. संस्था (मुलींची) येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न

112

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14जानेवारी):-जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आणि राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. एमआयडीसी चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा हे अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोबरागडे , ब्रम्हपुरी आय.टी.आय चे प्राचार्य श्री.डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी तंत्र प्रदर्शनीचे महत्त्व विषद केले. तर उद्घाटक श्री. रुंगठा यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराभिमुख कौशल्य संपादन करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.

‌या तंत्र प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यामधील १५ तालुक्यांच्या संस्थानी तसेच खाजगी संस्था, एमसीवीसी ने सहभाग नोंदवत प्रदर्शनी मध्ये विविध प्रकारचे अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी व नाविन्यता अशा तीन गटात तंत्र मॉडेल ठेवण्यात आले होते. परिक्षक म्हणून शास. अभि. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चव्हाण , प्रा. डॉ.डोंगरे, प्रा. साखरे, बिष्ट लाभले होते . अभियांत्रिकी गटात आयटीआय नागभीड व्यवसाय वीजतंत्री प्रथम पारितोषिक , द्वितीय पारितोषिक आयटीआय गोंडपिपरी व्यवसाय फिटर व तृतीय पारितोषिक आयटीआय ब्रह्मपुरी व्यवसाय एमएमवी तर बिगर अभियांत्रिकी गटात प्रथम आयटीआय चंद्रपूर (मुलींची) च्या व्यवसाय बेसिक कॉस्मेटोलॉजी, द्वितीय पारितोषिक आयटीआयची चिमूर व्यवसाय शिवण व कर्तन ला व तृतीय पारितोषिक आयटीआय वरोरा व्यवसाय फॅशन टेक्नॉलॉजी च्या माडेल ला मिळाले.

तसेच नावीन्यता गटात प्रथम पारितोषिक आयटीआय चिमूर व्यवसाय वेल्डर , द्वितीय पारितोषिक आयटीआय चंद्रपूर मुलींची व्यवसाय बेकर अँड कन्फेशनर व तृतीय पारितोषिक आयटीआय चिमूर व्यवसाय तारतंत्री यांना प्रदान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शील्ड देऊन त्यांना गौरवण्यात आले.पारितोषिक वितरण प्राचार्य कल्पना खोबरागडे , प्राचार्य श्री डांगे तसेच चंद्रपूर तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती जयश्री देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आर. ए. किदवाई ज्यु. कालेजचे अब्दुल रतिफ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व निदेशक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here