Home पर्यावरण मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे प्रशिक्षण संपन्न-घनशामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे...

मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे प्रशिक्षण संपन्न-घनशामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे आयोजन

172

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.13जानेवारी):-चिमूर तालुक्यातील सातारा येथील घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रात रविवार दि. १२ जानेवारीला एक दिवसीय मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चिमूर परिसरात शेतकरी व बेरोजगारी यांची समस्या अतिशय बिकट आहे, यावर उपाय म्हणून कोलारा गेट सातारा येथे घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असतात. शेतीमध्ये भातपिकातून तयार झालेली तनस, कोंडा व कुटार यांचा वापर करून मशरूमचे उत्पादन घेतले असता शेतकऱ्यांना घरीच भरघोस आर्थिक उत्पन्न घेता येते, यासाठी मशरूम ची लागवड कशी करायची, तयार झालेले मशरूम बाजारपेठेत कुठे व कशे विकायचे यावर डॉ अजय पिसे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना विलास दिघोरे व विशाल इंदुरकर यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

चिमूर, सिंदेवाही, नागभीड व नागपूर तालुक्यातून मशरूम लागवड प्रशिक्षणासाठी प्रसिक्षणार्थ्यानी सहभाग घेतला होता. युवकांनी शेती पूरक व्यवसाय करून स्वतः उद्योजक बना असे आव्हान मुख्य प्रवर्तक प्रा. डॉ अजय पिसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here