नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.11जानेवारी):-महाराष्ट्र साहित्य विश्वास प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळा न्यू रोशन सेलिब्रेशन हॉल आर्वी येथे स्मृतीशेष आई देवकाबाई बापूरावजी बनसोडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अमर काळे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी दलाल हे होते.
देवकाई राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार डॉ. प्रमोद नारायणे,वर्धा यांच्या स्पार्टाकशी मरण आले तरी.. या कवितासंग्रहात मिळाला. द्वितीय पुरस्कार गौतम ढोके, अमरावती यांच्या दंगल होतेच कशी.. या कवितासंगत मिळाला तर तृतीय पुरस्कार प्रा. संदीप गायकवाड, नागपूर यांच्या *काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश* या कवितासंग्रहाला मिळाला.
तर उत्तेजनार्थ पुरस्कार भारत सातपुते, लातूर यांच्या कवातरी चांदणं दिसेल.. व सीमा झुंजारराव मुंबई यांच्या जपते आहे अजून काही.. या कवितासंग्रहाला मिळाला. या पुरस्कारात रोख रक्कम, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व कवींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गझलकार प्रकाश बनसोड यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यानंद हाडके यांनी केले .या प्रसंगी मोठ्या प्रमाणात काव्यरसिक उपस्थित होते.




