Home महाराष्ट्र दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा केला सन्मान-व्हॉइस ऑफ मीडियाने काढला पत्रकारांचा पंधरा लाखाचा विमा

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा केला सन्मान-व्हॉइस ऑफ मीडियाने काढला पत्रकारांचा पंधरा लाखाचा विमा

179

 

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी, मो 86985 66515

 

गंगाखेड :- मराठी वर्तमानपत्राचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी वर्तमानपत्राच्या दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
व्हॉइस ऑफ मीडिया शाखा गंगाखेड यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमानी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे उपस्थित होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा पुष्पगुच्छ, टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच व्हॉइस ऑफ मीडिया शाखा गंगाखेड यांच्यावतीने पत्रकारांचा पंधरा लाखाचा विमा काढण्यात आला.

उपविभागीय कार्यालय गंगाखेड या ठिकाणी उपविभागीय कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या वतीने डॉ. जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलिप टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कराड इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. असून या कार्यक्रमासाठी प्रमुख माजी नगराध्यक्ष रामप्रभुजी मुंडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी, काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव, उबाटा गटाचे शहर प्रमुख जितेश गोरे यांच्या हस्ते उपस्थित सर्वच पत्रकार यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पेन देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्वतंत्रविर वि. दा. सावरकर सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष देवानंद जोशी, सा. गंगाखेड केसरीचे संपादक रामप्रसाद ओझा, गोदावरी स्वच्छता अभियान चे प्रमुख अँड राजू देशमुख कांदलगावकर, प्रतिभाताई वाघमारे, माणिकराव मुंडे, शिवप्रसाद कल्याणी, राम कासांडे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश बोरीकर यांनी केले. उपस्थितत पत्रकार बांधवांना माजी नगराध्यक्ष रामप्रभुजी मुंडे यांच्या वतीने स्नेह भोजन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here