रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.6जानेवारी):- दिनांक 06/01/ 2025 ला महाराष्ट्र पोलीस रीजनिंग स्थापना दिनानिमित्त लोक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गांगलवाडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीश डोरलीकर, तसेच पोलीस हवालदार अरुण पिसे बकल नंबर 1799,ट्राफिक पोलीस हवालदार राहुल लाखे बक्कल नंबर 10 75 पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी ,यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायदा जादूटोणा प्रतिबंधक कायदा ,तसेच भारतामध्ये लागू झालेले नवीन भारतीय न्याय संहिता ,भारतीय नागरी सुरक्षा संहिता या कायद्याविषयी जनतेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी.
तसेच कोणत्याही अल्पवयीन मुला मुलीवर होणाऱ्या अत्याचार विषयी तात्काळ पोलीस स्टेशनला व आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती द्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बुरडे सर ,जुम्नाके सर, वाळई सर ,रामटेके सर ,खांडेकर सर, राऊत मॅडम व सर्व शिक्षक रुंद हे हजर होते, शाळेत मधील 350 विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रम दुपारी 01/00 वाजता सुरू करून 03/00 वाजता संपवण्यात आला.




