बाळासाहेब ढोले, पुसद तालुका प्रतिनिधी मो. 78751 57855
*पुसद- क्रेनच्या धक्क्याने वृद्ध इसमास चिरडले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि. ४ जानेवारी२०२५ रोजी २.४५ वाजता च्या सुमारास घटना घडली आहे.
सदर इसम मांडवा येथील रहिवासी असल्याने या घटनेमुळे मांडवा परिसरात शोककळा पसरली आहे.
नारायण माधव कापसे रा. मांडवा असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. संतोष रामा कापसे चुलत भाऊ यांनी दिलेल्या फिर्याद वरून क्रेन चालक चंदन महाराज यादव वय 23 रा. कुकीपटी. उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात वसंत नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त माहितीनुसार नारायण कापसे हे
पुसद पंचायत समिती येथे घरकुल कामासाठी
छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौक मार्गे जात होते.
अशातच शैंबाळपिंपरी येथून क्रेन पुसद मार्गे यवतमाळ कडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायी जात असलेल्या नारायणच्या
अंगावरून क्रेन गेल्याने ते चिरडल्या गेले त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होऊन नारायण हे जागीच पडले अशातच पाठी मागून येत असलेली सफारी कार एम एच 12 यु एच 55 51 मागुन आली असता आजू बाजूच्या नागरिकांनी धावा घेऊन त्या सफारी गाडीच्या खाली आलेल्या नारायण ला काढले व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केल्याने शवविच्छेदना करिता पाठवण्यात आले.
पुढील कारवाई वसंत नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे.




