साहित्य चळवळीतील साहित्यिकांना मिळणारं पुरस्काराची मेजवानी
सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)
अमरावती(दि.4जानेवारी):-जिल्हातील पिंपळोद येथील कार्यरत कला फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्राच्याच कानाकोप-यात नव्हे तर देश विदेशात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवित नाव लोकिक प्राप्त केला आहे. कला फाऊंडेशन रजि. नं.एफ २७३१३ द्वारा आजवर अनेक पुरस्कार सोहळे, साहित्य संमेलन आयोजित करून आपल्या अंगी कोणत्या ना कोणत्या कलागुण जोपासणा-या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या अशा किती तरी होतकरू कलावंतांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल म्हणजेच २०२५ मध्ये कला फाऊंडेशनच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण, गायन, नृत्य, शैक्षणिक, चित्रकार, वकृत्व, सामाजिक, पथनाट्य, अभिनय अशा अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या कलावंताचा गुणगौरव करण्यात येत आहे. तरी आपण समाजात वावरत असताना पाहतो की आपले संत महापुरुषांनी साहित्य किंवा कुठल्या ही क्षेत्रात अगदी नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करून गेले.
त्यांच्याच प्रेरणेने आपणही एक सेवा करावी या उद्देशाने साहित्य चळवळ बळकट करून एक हक्काच व्यासपीठ मिळावे यासाठी फुले, शाहू, आंबेडकर पहिले साहित्य संमेलन आम्ही घेत आहोत. या संमेलनात साहित्य रत्न, कला गौरव, निसर्ग प्रेमी, आदर्श शिक्षक, डॉ.अब्दुल कलाम, नारीशक्ती जीवनगौरव, संत गाडगेबाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉ.भीमराव आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार इ. पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. तरी इच्छुकांनी आपल्या कार्याची माहिती, बायोडाटा खालील पत्त्यावर किंवा पीडीएफ स्वरुपात असल्यास व्हॉट्सअॅप वर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रशात दामले यांनी केले आहे.
प्रशांत ना. दामले
अध्यक्ष, कला फाऊंडेशन
मु/पो.पिंपळोद
ता.दर्यापूर, जि.अमरावती
पिनकोड – ४४४७०६
मो-८६०५५२१३६९




