Home अमरावती सावित्रीबाईंमुळे आजची स्त्री प्रगतीपथावर – प्रा.अरुण बुंदेले

सावित्रीबाईंमुळे आजची स्त्री प्रगतीपथावर – प्रा.अरुण बुंदेले

86

▪️फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांनी केले सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.4जानेवारी):-ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त उपेक्षित समाज महासंघ,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,सर्व शाखीय माळी महासंघ तसेच फुले- शाहू-आंबेडकर अनुयायांच्या वतीने राष्ट्रपिता जोतीराव फुले पुर्णाकृती पुतळा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दि.३ जानेवारी२०२५ ला करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले, रंगकर्मी सुशीलदत्त बागडे ,राजेंद्र हाडोळे,ओमप्रकाश अंबाडकर, मनिष देशमुख,सौ.वंदना मडघे, डॉ.विजयराव भोजने,विजयराव ढाकूळकर,गणेश मानकर इंजि. खरबडे,नाना रमतकर,अमर देशकर,नंदकिशोर वाठ,गोविंद फसाटे,प्रा.सुप्रिया गजभिये होते. तर राजेंद्र शहाकार,मधुकर आखरे, डि.एस.यावतकर,रुपेश फासाटे,डी- एस- पवार,सौ. भावना राऊत,सौ-वंदना कांडलकर,दत्तात्रय गणगणे, गुणवंत राऊत,संजय वाघुळे, देविदास उमप,वि.दा.पवार संतोष कुऱ्हेकर, अनिल भगत,इंजि.वामुदेव चौधरी, भोजराज आंबेडकर,रमेश राहत, इंद्रपाल शर्मा,अशोक गडलिंग, रवींद्र वानखडे,नारायण आंडे, संजय राऊत,प्रकाश कुरळकर, सुरेश अडगोकर यांची उपस्थिती होती .अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले .अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी” सावित्री माँ फुले “या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

बॉक्स

” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना सर्वप्रथम शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.”
– समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड
” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मनुवादी विचारांना लाथाडून स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांच्यात आत्मभान व स्वभिमान निर्माण केला. अविद्या ही मानवाच्या अधोगतीला कारण असल्यामुळे त्यांनी शिक्षणातून क्रांती केली .”असे विचार अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

बॉक्स
प्रमुख अतिथी
समाजप्रबोधकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी ,”स्वतःला कितीही त्रास झाला,तरी समाजसुधारणेच्या कार्यासाठी, स्त्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करणारी रात्रंदिवस झटून समाजासाठी कार्य करणारी स्री कार्यकर्ती असेल; तर स्त्रिया अधिक जवळ येतील.स्त्रिया स्त्रियांशी अधिक मोकळेपणाने वागतील.त्यातून आपल्या समाज सुधारणेला गती मिळेल. हे महात्मा फुले ओळखून होते. म्हणून त्यांनी या कार्यासाठी सावित्रीबाई फुलेंचं सहकार्य घेण्याचे निश्चित करून त्यांना शिक्षण देऊन भारतातील पहिली महिला शिक्षिका केले. त्या महात्मा फुले यांच्या कार्याशी एकरूप होऊन,स्त्री मुक्ती चळवळीच्या अविभाज्य भाग झाल्या.सावित्रीबाईमुळे आजची स्त्री प्रगतीपथावर आहे. त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळीतून फार मोठे कार्य केले .”असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी श्री गोविंद फसाटे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्री मधुकर आखरे तरओमप्रकाश अंबाडकर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला फुले – शाहू -आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here