Home महाराष्ट्र सायबर क्राईम ची व्याप्ती वाढली आहे- मा.श्री.महेंद्र जगताप

सायबर क्राईम ची व्याप्ती वाढली आहे- मा.श्री.महेंद्र जगताप

85

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.30डिसेंबर):-सायबर क्राईम ही कोणतीही गुन्हेगारी क्रिया आहे. ज्यामध्ये संगणक नेटवर्क किंवा नेटवर्क उपकरण समाविष्ट आहे. बहुतेक सायबर गुन्हेगार नफा मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांचा वापर करतात. तर काही सायबर गुन्हे संगणक किंवा उपकरणावर थेट नुकसान किंवा अक्षम्य करण्यासाठी केले जातात. आजकाल सायबर क्राईम ची व्याप्ती वाढली आहे. रेगुलर क्राईम जर 100 घडले तर सायबर क्राईम 200 घडतात. सायबर क्राईम कसा टाळता येईल, हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा. श्री. महेंद्र जयवंतराव जगताप (पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस ठाणे, कराड) यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” चौथ्या दिवशी ‘सायबर गुन्हे: जनजागृती या विषयावर बोलताना केले.

तसेच आपण आपला ओटीपी कोणालाही शेअर नाही केला पाहिजे. सायबर क्राईम झाल्यास 1930 या नंबर वर कॉल केला जातो. तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून सायबर क्राईम घडतो. तसेच मोबाईलवर जेव्हा एखादी लिंक येते तेव्हा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला बॅलन्स ट्रान्सफर होतो. आता येणाऱ्या नवीन वर्षात हॅप्पी न्यू इयर चे मेसेज सुद्धा क्लिक करू नका व चुका करू नका, पण जर चूक झालीच तर त्याची लगेच तक्रार करा असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. संजय जालिंदर पिसाळ युवा नेते हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या मा. प्रभारी प्राचार्य डॉक्टर श्रीमती. एस. आर. सरोदे मॅडम या होत्या.तसेच या कार्यक्रमास सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी अथर्व पिसाळ यांनी केले. तसेच प्रास्ताविक पूजा पाटील हिने केले व प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय मंजुषा पाटील हिने करून दिला. व आभार प्रदर्शन प्रज्वल बहुलकर या शिबिरार्थ्याने केले.या कार्यक्रमास एन.एस. एस कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी.पवार व सदस्य प्रा.आर.एस.पाटील, प्रा.एन. बी.पाटील, प्रा. डॉ.पी.एस.पाटील, प्रा.एस.बी.राठोड हे उपस्थित होते.या कार्यक्रमास सर्व शिबिरार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here