रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.30डिसेंबर):-महागाईच्या झळा प्रत्येक क्षेत्राला जाणवत असताना आता सलून व ब्युटी पार्लरच्या सेवांचा खर्चही वाढणार आहे. आज सलून दरवाढ संबंधित नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी ने विशेष चर्चासत्र घेऊन महागाईमुळे सेवा दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २० ते ३० टक्क्यांनी दरवाढ लागू केली जाईल. या नवीन दरांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ पासून करण्यात येणार असल्याचे नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी चे अध्यक्ष गोलुभाऊ फुलबांधे यांनी सांगितले.
मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरापासून ते देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कच्च्या मालाच्या दरासह इंधन दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायीकांकडून करण्यात येत होती. सलून आणि ब्युटी पार्लरसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, दुकानांचे भाडे, वीजबील, कारागीरांचा पगार आदींसारख्या आर्थिक विवंचनेत सलून व्यावसायिक अडकला आहे. सलून व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांमध्ये दरवाढ झाल्याने कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. विविध प्रकारच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नाभिक युवा आघाडी ने १ जानेवारीपासून सलून व ब्युटी पार्लरच्या दरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दरवाढीचा निर्णय सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लागू असणार आहे.
*असे असतील दरवाढ*
1)केस कापणे:- ८०ते १००रुपये (ब्रम्हपुरी शहर ) ७०रुपये (ग्रामीण )
2)दाढी करणे :-५० ते ७०रुपये (ब्रम्हपुरी शहर ) ४०रुपये (ग्रामीण )
3)कटिंग दाढी :-१२०ते १५०रुपये (ब्रम्हपुरी शहर )१००रुपये (ग्रामीण )
4)केसांना कलर लावणे :-१००ते १५०(ब्रम्हपुरी शहर ) १०० रुपये ( ग्रामीण )
५)स्क्रब, मसाज, फेसियल, तेल मालीश, इत्यादी सेवेमध्ये सुद्या ३० टक्याने वाढ होईल
*नागरिकांनी सहकार्य करावे*
कच्चा माल, वीज, पाणी, जागा भाडे, तसेच कामगारांचे वेतन यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महागाई व सध्याचे सलूनचे दर यात ताळमेळ बसत नव्हते. महागाईमुळे होणारे खर्च आणि स्पर्धात्मक बाजारात टिकण्यासाठी नवीन दरवाढीचा निर्णय, आज ब्रम्हपुरी शहर व तालुक्यातील सर्व सलून व्यावसायिक एकत्र येऊन सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.




