रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.30डिसेंबर):-ज्ञानगंगा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी लावलेली शिस्त अतिशय महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास बाळगून यशाची शिखरे पदक्रांत करावी. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे प्रतिपादन श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी बक्षीस वितरण प्रसंगी व्यक्त केले.
ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथील आयोजित स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ.अशोक सालोटकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद तोंडरे, गावचे पोलीस पाटील चंद्रशेखर पुसलवार, पंचायत समिती माजी सदस्य नामदेव महाजन राऊत, पोलीस पाटील चरण गडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश राऊत, हडदा येथील मुख्याध्यापक ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक विष्णूजी तोंडरे, सांस्कृतिक प्रमुख तू. ब. राऊत, इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी विद्यार्थ्यांनी यशाने होरपडून न जाता व अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करावे असे सांगत जीवनात अपयशातून यश प्राप्त केलेल्या अनेक व्यक्तींचे उदाहरणे त्यांनी याप्रसंगी दिले .पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी नम्र, विनयशील असावे. जे विद्यार्थी विनयशील असतात ते सर्वांना हवे हवेचे असतात. गुणवंत विद्यार्थी हे शाळेचे वैभव असते असेही त्यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .संस्था अध्यक्ष प्रमोद तोंडरे यांनी संस्थेच्या जडणघडणीतील वाटचाल व्यक्त करीत जे विद्यार्थी विद्यालयात उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेश प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये संस्था देणगी म्हणून देईल असे जाहीर केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक सालोटकर यांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांप्रति जागरूक राहून आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी शाळेत पालक सभेला उपस्थित राहण्याचे व काही सूचना असल्या सुचविण्याचे आवाहन करीत सर्व नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी कु. नन्नावरे व आभार मुख्याध्यापक विष्णूजी तोंडरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख तू. ब. राऊत, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. आर. तुपटे, सी. जी. बांते, सौ. आर. ए. पिलारे, पी. एस. वर्धलवार, सौ. तोंडरे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी,शालेय मंत्रिमंडळाचे सर्व विद्यार्थी, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सदस्य, शाळा सुधा समितीचे सदस्य, इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.




