कृषी प्रदर्शनात भेट,गांधी तिर्थ आणि जैन सिस्टम लिमिटेडचे संचालक अजित जैन यांच्याशी संवाद
सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8208946716
चिमूर(दि.29डिसेंबर):- विदर्भातील 40 पत्रकारांचा जैन इरिगेशन कृषी प्रदर्शन आणि गांधी तीर्थ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता.या दौऱ्याची सुरुवात २८ डिसेंबरला सकाळी नागपूर येथून झाली.२९ डिसेंबरला जळगाव येथील जैन इरिगेशनच्या कृषी प्रदर्शनात ४० पत्रकार सहभागी झाले.
या दौऱ्याद्वारे पत्रकारांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत विकास, आणि टिश्यू कल्चर प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतींची माहिती घेतली.यामुळे कृषी क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हाने याबाबत व्यापक दृष्टिकोन निर्माण होईल.गांधी तिर्थाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.व जैन सिस्टम लिमिटेडचे संचालक अजित जैन यांच्याशी विदर्भातील ४० पत्रकारांनी संवाद साधला.यावेळी जैन इरिगेशनचे प्रसिद्ध प्रमुख अनिल जोशी, देवेंद्र पाटील, किशोर कुलकर्णी आणि कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते.
या दौऱ्यात आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, बी. संदेश, प्रवीण नन्नेवार, तुकाराम एस. लुटे, राजू कापसे, सुरेंद्र बिरानवार, सुरेश डांगे, दिलीप घोरमारे, नितीन पाटील, रवि खाडे, संजय वालके, अनिल नौकरकर, दीपक नवडेती, राजू रामटेके, नितेश पाटील, संजय नागदेवते, दयालनाथ नानवटकर, राम वाडीभश्मे, दिलीपकुमार इंगोले, हर्षपाल मेश्राम, पंकज एस. चौधरी, सुगत गजभिये, शेखर गजभिये, कैलास निगोट, राजकिशोर गुप्ता, धनगोपाल मुझबैले, सचिन ढेंगरे, नितीन येनुरकर, लेकराम डेंगे, कपिल वानखेडे, पवन वानखेडे, रामदास हेमके,व्ही. पद्माकर, विकास उके, फ्लॅन्श गजभिये, नाना केने आदी सहभागी आहेत.