Home धार्मिक  पुसेगाव साठी सर्वतोपरी मदत करणार-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुसेगाव साठी सर्वतोपरी मदत करणार-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

100

✒️सातारा प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.29डिसेंबर):-पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रथपूजन व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत उदयन राजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, १०८ प.पू. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज, श्रीसेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगाव चेअरमन डॉ. सुरेश सर्जेराव जाधव, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव विश्वस्त रणधीर सुभाषराव जाधव, सचिन हिंदुराव देशमुख, संतोष मुगुटराव जाधव, गौरव रायसिंग जाधव, संतोष गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना मंत्री आमदार शिवेंद्रजी भोसले म्हणाले, ग्रामस्थांनी शासन प्रशासन यांच्या समन्वयाने पुसेगाव मधील रिंग रोडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून कोरेगाव येथील वाहतूक कोंडी वर सुद्धा तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही यावेळी ते म्हणाले संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठी बैलगाडी शर्यतीसाठी नावलौकिक असलेले पुसेगाव यात्रा जास्त दिवस चालणारी यात्रा म्हणून पुसेगाव यात्रेचे नावलौकिक आहे.

झेंडा मिरवणूक ने सुरुवात होऊन दिवस रात्र व्हॉलीबॉल स्पर्धा, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यती, कुस्त्या शॉन प्रदर्शन आणि श्वान शर्यती तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असल्याने जनावरांचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here