Home अमरावती सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष विनोद इंगळे यांचा सत्कार

सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष विनोद इंगळे यांचा सत्कार

80

▪️कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान व उपेक्षित समाज महासंघाचे आयोजन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.26डिसेंबर):- कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान व उपेक्षित समाज महासंघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष विनोद इंगळे यांचा समाजिक कार्याबद्दल भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद इंगळे यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,पुष्पगुच्छ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक देऊन प्रतिष्ठानच्या कार्यालयात दि.२६ डिसेंबर २०२४ ला केला.

याप्रसंगी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी,” श्री विनोद इंगळे हे एक समाज कार्यकर्ते असून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे नेण्याचा प्रयास ते करीत आहेत.सत्यशोधक समाज समितीच्या माध्यमातून ते महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते करीत राहणार आहेत.त्यांना पुढील समाज कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा देतो.॥” असे विचार व्यक्त केले .

याप्रसंगी उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड श्री विनोद इंगळे यांना सत्कारानिमित्त ऑनलाइन शुभेच्छा देताना म्हणाले,” महात्मा फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.ही गरज सत्यशोधक समाज समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे काम श्री विनोद इंगळे करीत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा.”असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी सत्कारमूर्ती विनोद इंगळे यांनी ,” क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रचार व प्रसार सत्यशोधक समाज समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्वदूर करील .” असे मत व्यक्त केले. यावेळी सत्यशोधक समाज समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here