Home महाराष्ट्र येवती येथे भोई समाज संघटनेची सभा संपन्न

येवती येथे भोई समाज संघटनेची सभा संपन्न

124

▪️प्रलंबित प्रश्न व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चात्मक प्रकाश

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.10डिसेंबर):-महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेचे वतीने भोई समाजाचे प्रलंबित घरकुल, रोजगार, मासेमारी, शिक्षण, विधवा महिलांचे प्रश्न, इतर व्यवसाय, वसतिगृह तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, राळेगाव येथे भोई समाज जोडो कृती कार्यक्रम, वधुवर परिचय मेळावा घेण्याकरिता सद्गुरु संत सोनामाता मंदिर डोमाघाट येवती येथे वडकी जिल्हा परिषद गणातील भोई समाजाच्या निवडक कार्यकर्त्यांची भोई समाजाचे नेते श्री मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात सभा घेऊन वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. भोई समाजाचे प्रलंबीत प्रश्न मांडण्याकरीता कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. राळेगाव येथे भोई समाजाचा भव्य मेळावा घेण्याकरीता ठराव घेण्यात आला तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता प्रतिनिधित्व करण्याचे एकमताने ठराव करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते मा.श्री रामकृष्णजी घरडे होते. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सांगितले की, भोई समाज अतिशय मागास आहे. भोई समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या प्रत्येक चळवळीसोबत असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी महिला प्रतिनिधी सौ गिताताई पडाल व युवा नेता राहुल पडाल व श्री सुरेशराव दाते यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गणात सभा घेऊन प्रत्येक गावात सभा घेण्यात येणार असल्याचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेचे सूत्र संचालन लक्ष्मण बावणे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भैय्या सातघरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here