Home नागपूर सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे?

सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे?

441

राजकीय सत्ता स्पर्धेत उतरायचे असेल तर बिनभांडवली “राज” कारण करता आले पाहिजे. विचारधारा नसली तरी चालेल पण उपद्रव मूल्य दाखविण्याची हिंमत पाहिजे. त्यासाठी बिनडोक तरुण मुलाची फौज पाहिजे, त्यांना प्रथम तोडफोड करून हिरो बनवायचे मग त्यांच्या नावाखाली तडजोड करून हप्ते सुरू म्हणजेच बिनभांडवली “राज” कारण?यशस्वी होतांना दिसत आहे, सत्ता, नाही की विरोधी पक्ष नाही तरी राज्यात बिनभांडवली “राज” कारणाची दहशतवादी पक्ष संघटना म्हणून मान्यत आहे. तरी कोणता ही बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, पत्रकार सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे? हे विचारण्याचे धाडस करत नाही.

लोकसभा निवडणुकीत दोनशे बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, पत्रकार, लेखक,अभिनेते कलावंत यांनी बसपा,वंचित भाजपाची बी टीम आहे तिला मतदान करू नका असे जाहीर आवाहन केले होते. तेच लोक सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे? यावर बोलत नाही आणि लिहत नाही. हीच त्यांची निर्भीड निपक्ष निर्भय भूमिका मतदारांनी गांभीर्याने लक्षात घ्यावी. विशेष बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी, गरीब मराठा, आदिवाशी भटक्या, विमुकत्यासह अल्पसंख्यक मुस्लिम समाजाने समजून घ्यावी.

शिक्षण घेण्यासाठी पहिला डोनेशन भरावे लागते त्याशिवाय प्रवेश मिळत नाही, म्हणूनच कष्टकरी कामगार मजूर म्हणतात शिक्षण घेणे किती महाग झाले, एखादा माणूस बिमार पडला तर त्यांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी प्रथम डिपाजित भरावे लागते तेव्हाच डॉक्टर हात लाऊन इलाज करतात. त्यावेळी अनेक प्रकारच्या टेस्ट सांगितल्या जातात त्या केल्या शिवाय तडजोड नाही. तेव्हा प्रत्येक माणूस हॉस्पिटल खर्च किती महाग झाला ही खंत व्यक्त करतो. रोजगार मिळत नाही. कष्टाची बारा बारा तास काम करून ही किमान वेतन मिळत नाही. त्याविरोधात बोलण्याची कोणतीही सोय नाही.आवाज उचलला तर कामावरून काढल्या जाते. मालकांचे किंवा ठेकेदारांचे अनेक पक्षाशी आर्थिक हितसंबंध असतात. पक्षाचे कार्यकर्ते नेते अशा भानगडीत लक्ष देत नाही. मग महागाई विरोधात कोण लढणार? भ्रष्टाचारा विरोधात कोण लढणार व किती लढणार हे आता राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे कामकाज पाहिल्यावर भारतीय नागरिकांना समजले असेल. आजचे सत्ताधारी राजकीय पक्षनेते कालचे २०१४ पूर्वी विरोधीपक्ष नेते होते तेव्हा त्यांनी बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई विरोधात देशभरात किती रान पेटविले होते याची आठवण करा आणि शांत बसा.

मराठी माणसांना न्याय हक्क देण्यासाठी लढणाऱ्यानी उत्तर भारतीय टॅक्सी वाल्यांना मारहाण केली, मात्र कधीच एकाही सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मालकाच्या कानाखाली मारली नाही. एकाही बिल्डरच्या कामावर जाऊन कामगार कोण आहेत त्याची चौकशी केली नाही.गुजर मारवाडी व्यापाऱ्यांनी दुकानांवर दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी मराठीत पाटी लावली नाही म्हणून, पेट्रोल पंप वर, टोलनाक्यावर तोडफोड झाली. त्यामुळे मराठी माणसांना विशेष तरुणांना न्याय हक्क अधिकार रोजगार मिळाला असेलच.

मराठी हृद्य सम्राटासाठी एक तरूण तडपदार अत्यंत हुशार सर्वांचा लाडका मुलगा एकदा गाड्या फोडताना पोलिसांनी पकडला. तुरूंगात पोलिसांनी रक्ताचा एक ही थेंब बाहेर येणार नाही याची दक्षता घेऊन चांगला चोप दिला आणि रीतसर केस बनवली. त्यामुळे कोर्टाची केसवारी दरमहा सुरू झाली. आईवडिलांनी वाटेल ते काम करून मुलांना इंग्रजी मेडियम मध्ये शिक्षण दिले. नोकरी शोधात असतांना पोरगा मराठी हृद्य सम्राटाचा मनसे सैनिक झाला. आणि करिअर गेलं,वर्ष वाया गेलं, जामीन नाही, जवळ पैसे नाहीत, आईबाप खंगले,तो तर आयुष्यातूनच उठला. असे एक नाही हजारो मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक म्हणून भरडल्या गेले, त्यांची कुठे ही मोजमाफ नाही. कारण त्याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले होते. आणि तो पेटून उठला होता प्रचंड उर्जा घेऊन भडकला होता. त्यांचे आयुष्य जरी बरबाद झाले असले, तरी पण त्याच्यामुळे बिनभांडवली “राज” कारण करणाऱ्या नेत्याची मोठी प्रगती झाली. हे सर्व समाजाचे नागरिक विसरले आहेत.

बिनभांडवली “राज” कारण करण्यासाठी विशेष गुणवंता लागते. तरुणांना नकारत्मक विचारांची नशा दिली कि तो नशेतच पेटून उठतो. ज्या प्रमाणे दारू विक्रेत्या दारूची नशा गुणदोषांचे मूल्य मापन न करता विकतात. तरुण परिणामाची परवा न करता पितात. त्याच प्रमाणे बिनभांडवली “राज” कारण करणारे नेते नकारत्मक विचारांची नशा मुलांना देत राहतात. दारूची नशा चार, आठ तासांनी उतरते. पण द्वेषाची नशा चढतच राहते. मग एक दिवस दारू विकणारा बंगला बांधतो. त्याच पद्धतीने बिनभांडवली “राज” कारण करणारा नेता कोहिनुर बांधून किंवा सेंटर हॉटेल खरीदी करून काही दिवसात तिची विक्री करतो आणि किती करोड उत्पन्न मिळवतो. नंतर मान्यताप्राप्त सुपारीबाज राजकीय नेता होतो. लोकसभा निवडणुकीत मनुवादी भाजपला बिनशर्थ पाठिंबा देतो. मराठी माणसांच्या समस्या काय आहेत त्या कशा सोडविणार यावर उत्तर नाही. कोणाच्या जाहीर सभेत कोण काय बोलले होते. आम्ही मुस्लिम समाजात दलितात कशी दहशत निर्माण केली होती ते गर्वाने सांगितले जाते.

मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक मात्र दारू पिणाऱ्या भिकाऱ्या पेक्षा भिकारी होतो. तर छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कोणीही देव- देवता यांची नावे सर्रास घेऊन मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाच्या तरुणांना त्यांच्या नावाने भडकावले जाते. मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक कधीच विचार करत नाही. ज्याने भडकावले त्याचा मुलगा असतो? स्टडीरूममधे. आणि जे भडकले ते मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जातात कस्टडी रूममध्ये. ज्यांनी भडकवले त्यांचा मुलगा अभ्यास करतोय आणि मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते खडी फोडायचाअभ्यास करतात.

बिनभांडवली “राज” कारणी नेत्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो आणि मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते देशी प्यायला जातात. भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड इंग्लिश बोलतो आणि मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेला तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतो.कुठे गेली लाज,लोक लज्जा, कुठे गेला आत्मसन्मान. छत्रपती शिवाजी महाराजांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता. पण स्वाभिमान मात्र गहाण टाकलाय. दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.

दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून मोठं व्हावं. दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा स्वतःचं रोपटं लावावे त्याची काळजी घेतली तर त्याचंही मोठं झाड होईल. त्याला गोड फळे येतील. तेच तुम्हाला खायाला मिळणार नसले तरी तुमचे नातू मात्र हक्काने खातील.हे मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाच्या तरुण मनसे सैनिकांना कधी कळणार म्हणूनच त्यांनी हे बिनभांडवली “राज” कारण समजून घावे.

आम्ही २१ व्या शतकात स्मार्ट फोन, एंटर नेट, वाय फ्राय कॉम्प्युटर चा वापर करून ही उपास, नवस, पायीपद यात्रेला महत्व देऊन वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करत असू तर हीच गोष्ट मनाला खटकनारी आहे.या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांचे ऐका. नोकरी, व्यवसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इकडे लक्ष द्या. मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षात गेलेल्या मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या तरुणांनो ते राजकीय पक्ष म्हंणून सत्तेसाठी कधी युती आघाडी करू शकतात.आपले काय?

पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले राजकीय पक्षा पासून लांब राहून CA, CMS, BMS, BBA, MBA ची ज्या मेहनतीने तयारी करतात. त्या पद्धतीने मराठी मुल तयारी करीत नाही.ती काय करतात? दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात. ऊत्तर भारतातील मुले UPSC, railway ची तयारी करतात. त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले, शिर्डी पदयात्रा, दहीहंडी, गणपती, नवरात्रीची सर्वशक्ती लावून तयारी करतात, वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात. ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हे सर्व देवाची यात्रा, पूजा केली त्यांना मात्र कोणताच दोष देत नाही करतात.ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते. तेव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष, पक्षाचा तालुकाध्यक्ष, युवाध्यक्ष, शाखा किंवा कार्यकर्ता असतो आणी नंतर बेरोजगार. तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत. म्हणूनच जगा फक्त तुमच्या आई-बापासाठी,समाजाच्या हितासाठी चळवळीत काम केल्यास कायम लक्षात राहाल.आणि समाज तुमच्या मागे कधी ही, कुठेही उभा राहील. सुखा दुखात सहभागी होणाऱ्या मित्रांसाठी कायम जागरूक रहा प्रेम जिव्हाळा हा मतलबा पुरता नसावा. कायम मैत्रीभावना वाढणारा असावा.

दोन समाजात कायम तेढ निर्माण करून स्वतचे अस्तित्व टिकविणारा बिनभांडवली “राज” कारण करणारा नेता ओळख आणि सावध व्हा. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारात होणारा खासगी मालकांचा भ्रष्टाचार यांना का कधीच दिसत नाही. महाराष्ट्रात तीन हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आल्या वर सुपारीबाज नेत्याणे कोणती भूमिका घेतली किती जन आंदोलन केले. त्यासाठी त्या विरोधात कुठेच आवाज काढला नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या कानाखाली मारण्याची आरोळी का दिल्या गेली नाही. कारण त्यांच्या भरोशावरच तर बिनभांडवली “राज” कारण चालते.हे तरुणांनी विसरू नये.मनसेला मतदान केल्यास मराठी माणसात आणि कट्टर हिंदूत विभागणी होणार नाही काय? त्याचा फायदा कोणाला होणार आहे?स्वतच्या अस्तित्वासाठी मिशन म्हणून काम करणारा पक्ष आणि त्याचा नेता प्रकाश आंबेडकर बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, पत्रकार, लेखक, अभिनेते कलावंत यांना बसपा, वंचित भाजपाची बी टीम आहे तिला मतदान करू नका असे जाहीर आवाहन करते. तेच लोक सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे? हे निर्भीड निपक्ष निर्भय भूमिका घेऊन मतदारांना सांगतील काय?..विशेष बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी, गरीब मराठा,आदिवाशी भटक्या, विमुकत्यासह अल्पसंख्यक मुस्लिम समाजाने मतदार म्हणून ही भूमिका समजावून घ्यावी.सुपारीबाज राज ठाकरे कोणाची बी टीम आहे?

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप, मुंबई)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here