सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दि.२५ जानेवारी)
राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा बी शेख आणि स्वामी विवेकानंद या महापुरुषांनी अंधारात पडत पडलेल्या समाजासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे.
या राष्ट्रीय पुरुषांचे स्मरण आणि त्यांनी केलेल्या दिशादर्शक अशा विचार कार्यावर आपली थोडीशी तरी वाटचाल असावी आणि त्यांचे विचारांचा प्रचार प्रसार व्हावा हा उद्देश ठेवून दिनांक २४ जानेवारी २०२४ बुधवार रोजी संयुक्त पत्रकार संघ उमरखेडचे वतीने संयुक्त जन्मोत्सव सोहळा थाटामाटा मध्ये साजरा करण्यात आला.
संयुक्त पत्रकार संघ उमरखेडचे वतीने आयोजित केलेल्या या संयुक्त जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. ॲड. संतोष जैन (ज्येष्ठ विधी तज्ञ) तथा प्रमुख पाहुणे म्हणून मा.भाविक भाऊ भगत (सामाजिक कार्यकर्ता), महंत वानखेडे बुवा (कुपटी), ॲड.अनिल माने, धम्मपाल इंगोले हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून करणाऱ्या शेतकरी,पत्रकार,वकील, डॉक्टर्स, इंजिनीयर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा संविधान उद्देशिका प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत कु.तृप्ती दळवी, माता सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषेत कु.कोमल दळवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत कुणाल चौधरी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक शिवाजीराव माने व सल्लागार रितेश पाटील कदम यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवेश कवडे, सचिव सुनील लोखंडे, उपाध्यक्ष शेख इरफान, गजानन वानखेडे, शेख तहसीन ,शेख मुजाहिद,शेख खाजा,विशाल मस्के यांनी अथक परिश्रम घेऊन जन्मोत्सव सोहळा यशस्वीरित्या थाटामाटात साजरा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्रनाथ दळवी तर आभार प्रदर्शन गजानन वानखेडे यांनी केले.




