अहमदनगर –
दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथास जाहीर झाला असून २४ डिसेंबर रोजी दैनिक लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्रजी दर्डा यांच्या शुभहस्ते तरवडी ता.नेवासा येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली.
दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर पुरोगामी, प्रगतशील,सत्यशोधक विचारांच्या ग्रंथांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात.सन २०२२/२३ च्या पुरस्कारासाठी सुनील गोसावी यांच्या ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथाची दखल घेण्यात येऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या ग्रंथात त्यांनी विविध सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या समवेत घडलेल्या घटना,घडामोडी बद्दल विविध लेखाद्वारे आत्मचरित्रपर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. सुनील गोसावी हे सप्तरंग, लोकायत,नवजीवन व महर्षी प्रतिष्ठान,शब्दगंध साहित्यिक परिषद या संस्थांशी संबंधित असून त्यांनी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना, आदर्श गाव हिवरे बाजार येथील यशवंत पाणलोट विकास संस्था, काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन या संस्थांमध्ये काम केलेले असून सध्या ते देवळालीप्रवरा येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून मानधन तत्वावर कार्यरत आहेत.
शब्दगंध प्रकाशन च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथास हा सातवा पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आ.लहू कानडे,आ.संग्रामभैय्या जगताप,प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य जी.पी.ढाकणे,प्रा. डॉ.शंकर चव्हाण,प्राचार्य चंद्रकांत भोसले,ज्ञानदेव पांडुळे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड.सुभाष पाटील लांडे,चंद्रकांत पालवे,काँ.बाबा आरगडे व शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.
Home महाराष्ट्र सुनील गोसावी यांच्या आठवणींच्या डोह या ग्रंथास दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य...