Home Breaking News धरणगावातील समस्या मार्गी लावा; युवक काँग्रेसची प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी मुख्याधिकारी जनार्दन...

धरणगावातील समस्या मार्गी लावा; युवक काँग्रेसची प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना निवेदन देताना युवक काँग्रेसचे महेंद्र पाटील सोबत कार्यकर्ते 

279

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगाव : शहरातील विविध समस्या तत्काळ मार्गी लावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे महेंद्र सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याकडे आज रोजी निवेदनाद्वारे मागणी केली. युवक काँग्रेसचे श्री. पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, धरणगाव शहराला नळाद्वारे प्रतिदिन किमान एक तास पाणी पुरवठा करावा, शहरातील संपुर्ण खोदलेल्या रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून, तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे, यासह शहरातील विविध समस्या लक्षात घेऊन तात्काळ मार्गी लावण्याबाबत निवेदनात नमूद केले आहे. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात समस्यांसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्याची मागणी करीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी. निवेदन सादरप्रसंगी युवक काँग्रेसचे महेंद्र पाटील, दिनेश पाटील, कैलास माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here