सहसंपादक // उपक्षम रामटेके 9890940507
शंकरपूर- येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मागील तीन वर्षापासून येथील महिलांसाठी व अपंग लोकांसाठी “सरपंच भाऊबीज मानधन योजना” राबविण्यात आली. या योजनेचा शुभारंभ भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.
या कार्यक्रमात विधवा, 65 वर्षावरील महिला लाभार्थ्यांना व अपंग लाभार्थ्यांना मानधन देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटक धनराज मुंगले, अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ अविनाश वारजूकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर विधानसभेचे कांग्रेस समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गजानन बुटके, सरपंच साईश वारजूकर, चिमूर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष व माजी सभापती रोशन ढोक, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष सविता चौधरी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बावनकर, गोकुल सावरकर, उपसरपंच अशोक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अपंग असलेले विनोद कोडापे व देवराव गायकवाड यांना तीन चाकी सायकल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील 143 महिलां लाभार्थी, 351 विधवा महिल लाभार्थी व 43 अपंग लाभार्थ्यांना मानधन देण्यात आले.
या कार्यक्रमानंतर नागपूर येथील नटरंग डान्स ग्रुपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमाचे संचालन विजय गजभे, प्रास्ताविक व आभार अमोद गौरकर यांनी केले. कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सादिक शेख, बाळा ढोक, रवींद्र राखडे, राम शेरकी, सचिन निकुरे, राजू बघेल यांनी परिश्रम केले.




