सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 12 नोव्हेंबर)
उपविभागीय कार्यालय (महसूल) अवैध रीती तस्कराचा संरक्षणाचा अड्डा बनला आहे.
कार्यालयातील साहेबांच्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या एका कर्मचाऱ्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर नातेवाईक आणि मित्र अवैध रेती तस्करीत गुंतलेले आहेत तसेच याच्या मार्फतच अवैध रेती तस्कराचे हप्ते गोळा होतात असेही कळते.
नागपंचमीच्या वेळेस अचानक उमरखेड पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी अवैध पत्त्याचा डाव पकडण्यासाठी कर्तव्यावर चालगणी येथे गेले होते तेव्हा त्यांना अवैध तस्करी करणारे काही ट्रॅक्टर अचानक चालगणी विडूळ रोडवर रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आढळले होते आणि त्यांना पकडून त्यांच्याकडून त्यांनी दोन लाखापेक्षा जास्त रक्कम उकळल्याची माहिती आहे.
त्यात दोन पत्रकार रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी गेले असता त्यांच्या तोंडात सात हजार रुपये कोंबून हे प्रकरण तेथेच रफादफा करण्याचा प्रयत्न झाला.
परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रुपये खाल्ले आणि अचानक मारलेली रेड हप्ता वेळच्या वेळा देऊन सुद्धा पोलिसांनी रेड कशी मारली असा सवाल रेती तस्करांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय कार्यालयात येऊन त्या संबंधित हप्ताखोर कर्मचाऱ्याला विचारला परंतु त्याला ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही रेड का व कशी मारली याची माहिती नव्हती त्याचे कारण म्हणजे पोलीस कर्मचारी हे नागपंचमीचा पत्याचा डाव पकडण्यासाठी गेले होते परंतु अचानक त्यांना अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर सापडले होते आणि त्यांनी त्यात आपले पितळ पांढरे करून घेतले होते. याची बातमी सुद्धा सोशल मीडियावरून आलेली आहे.
या जॉब चे उतर त्या कर्मचाऱ्याला देता आला नव्हते याचा अर्थ उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये सुद्धा लागेबांधे आहेत की काय अशी शंका सध्या नागरिकांना येत आहे .
सध्या तरी या कार्यालयातील हा कर्मचारी स्वतःला उपविभागीय अधिकारी समजत असून या कार्यालयाचा सर्व कारभार आपल्याच हाताने होतो अशा भ्रमात वागत आहे.
याची कृती पाहून या कार्यालयातील दुसरे कांही कर्मचारी सुद्धा अवैध रेती व मुरमाच्या अवैध कमाईत गुंतले असल्याचे खात्रीदायक माहिती आहे .सध्या तरी उपविभागीय अधिकारी कार्यालय हे गौण खनीज तस्करांचा बचावाचा अड्डा झाला की काय अशी शंका नागरिकांना येत आहे.यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय बदनाम होत आहे.
आपल्या खुर्चीच्या अवती भवती असलेल्या आशा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड साहेब करतील का असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
