Home महाराष्ट्र आदर्शमाता प्रतिष्ठान समाजकार्यातला आयडॉल – चंद्रकांत खंडाईत

आदर्शमाता प्रतिष्ठान समाजकार्यातला आयडॉल – चंद्रकांत खंडाईत

258

 

कराड- आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान हे ध्येय आणि धोरणाप्रमाणे काम करीत असले तरीही ध्येय आणि उद्देशाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपून एक समाजकार्यात नवा आयडॉल बनले आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.

रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाळीत एका कार्यक्रमानिमित्त करावे ते आले होते. यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या कराड येथील मुख्य कार्यालयास त्यांनी भेट दिली. प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन प्रतिष्ठानच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून कौतुकही केले.
यावेळी चंद्रकांत खंडाईत म्हणाले, प्रतिष्ठानची दिवसेंदिवस प्रगती कडे चाललेली वाटचाल आणि दिशादर्शक विचारधारा त्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचाच आदर्श इतर सामाजिक मंडळांनी आणि संस्थानी घेऊन काम करावे असे आवाहनही इतर सामाजिक संस्थांना केले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी चंद्रकांत खंडाळे यांचा पुष्पगुच्छ मुख्य देऊन सत्कार केला. कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलार दक्षिण तालुका अध्यक्ष राजेंद्र कांबळे, रिपब्लिकन सेनेचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद सावंत, सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर, रिपब्लिकन सेनेचे करार दक्षिण तालुका अध्यक्ष प्रशांत कांबळे, ज्येष्ठ पत्रकार आणि आदर्शमाता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक दिलीप महाजन, पेरलेचे युवा नेते प्रशांत चव्हाण, नांदलापूरचे युवा नेते प्रतीक शिर्के, कापीलचे पोलीस पाटील तुषार ढापरे, उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रणालीनुसार आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच विचाराने मी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानची स्थापना केली असून ध्येय आणि उद्देशा बरोबर काम करीत राहणारच त्याचबरोबर ध्येय आणि उद्देशाच्या पलीकडे जाऊन सुद्धा सामाजिक बांधिलकी यापुढे जपण्याचं काम नक्कीच प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here