सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 31 ऑक्टोंबर)
शासनाच्या नियमानुसार सर्व ग्रामपंचायत यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करणे अथवा निधी देणे आवश्यक आहे. परंतु सन 2020 पासुन ते आजपर्यंत पात्र अपंग लाभार्थ्याना ग्रामपंचायत बाळदी यांच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे साहित्य वाटप अथवा निधी देण्यात आला नाही.
तरी आपणास नम्र विनंती की, वरील प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटप व निधी मिळवुन देण्याची कृपा करावी,यावेळी निवेदन देतांना
प्रवीण इंगळे(बाळदि शाखा प्रमुख) विवेक जळके, अविनाश दुधे ,दीपक ठाकरे ,नितीन राठोड, दीपक ठाकरे,संतोष हरण ,प्रफुल वानखेडे, शाम वटाणे,राजकुमार भगत आदी उपस्तित होते.




