Home यवतमाळ आसोली जिल्हा परिषद शाळेला मिळाले तीन शिक्षक

आसोली जिल्हा परिषद शाळेला मिळाले तीन शिक्षक

120

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी

पुसद -तालुक्यातील गौळ जिल्हा परिषद केंद्रांतर्गत येत असलेल्या आसोली जि.प. शाळेमध्ये विद्यार्थी संख्या २३६ आहे .परंतु शिक्षक केवळ ६ होते. अतिरिक्त शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर यरमल व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण अंभोरे आणि गावाचे सरपंच पुष्पा कोल्हे यानी पाठपुरावा केल्यामुळे आज शाळेला तीन शिक्षक मिळाले.आता एकुण ९ शिक्षक झाले .याचा संपूर्ण गावकऱ्यांना खूप आनंद झाला.या आनंदाचा एक भाग म्हणून शाळेमध्ये नवीन रुजू झालेल्या सर्व शिक्षकवृंदाचा स्वागतसत्कार समारंभ आज दि.२८ ऑक्टोंबर २०२३रोजी आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी सर्वांचे शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी यावेळी गावकऱ्यांना आश्वासित केलं की आम्ही सर्वजण या शाळेला नावारुपास आणू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हवे ते कष्ट घेण्याची तयारी आहे अशी भावना व्यक्त केली. आणि त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दलक सर्व गावकऱ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक किशोर यरमल ,शिक्षक मोतीराम वाघमारे ,चिरंगे सर ,काशिनाथ बोके, सिंधू कबले ,सोनिया पंडित ,शरद काळे सर,शेख असिफ,मंदाडे मॅडम,श्रीकांत कामारकर सर तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच पुष्पाबाई कोल्हे ,ग्रामपंचायत सदस्य वर्षा काष्टे ,वंदना मस्के ,चंचलाबाई आंभोरे,पारूबाई राठोड, प्रीती देव्हारे व प्रतिष्ठित नागरिक विकास काष्टे लक्ष्मण, मार्तंड शिंदे आंभोरे,मनोज काष्टे, नंदू फूके, रामराव देव्हारे,किसन राठोड, महेंद्र जाधव,अशोक मस्के,आत्माराम पवार, अनिल डाऊ, आप्पा पांडे,विष्णू छोटू आंभोरे, मस्के, गजानन देव्हारे ,राहुल कोल्हे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here