धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे व शाळेचे ग्रंथपाल गोपाल पंढरीनाथ महाजन यांच्या हस्ते डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी शाळेच्या मैदानात ग्रंथ प्रदर्शन भरविले यातून शाळेच्या सर्व मुला-मुलींनी व शिक्षकांनी आपापल्या आवडीचे ग्रंथ वाचण्याचा आनंद घेतला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते पी जी माळी यांनी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या ग्रंथालयाला प्रा.हरी नरके लिखित महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हा ग्रंथ भेट दिले. ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनपट उलगडून त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तक वाचली पाहीजे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन महाजन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाल महाजन, पी डी पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.




